अकोला दिव्य न्यूज : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील सामन्याला जोरदार विरोध होत आहे. भारत हा पाकिस्तानबरोबर खेळण्यासाठी लाचार का आहे, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. पण या प्रश्नाचं उत्तर आता बीजेपीचे खासदार अनुराग ठाकूर यांनी दिली आहे. अनुराग ठाकूर यांचा व्हिडिओ आता जोरदार व्हायरल झाला आहे. कारण या व्हिडिओमध्ये त्यांनी भारताला पाकिस्तानशी सामना का खेळावा लागत आहे, याचे कारण एका वाक्यात सांगितले आहे.

भारताच्या दहशतवादी हल्ल्यात २६ निरपराध लोकांचा बळी गेला होता. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर करत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आणि या हल्ल्यात पाकिस्तान कसा दोषी आहे, हे भारताने दाखवले होते. त्यानंतर भारताने सिंधू करारही पाकिस्तानबरोबर रद्द केला होता. ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात लिजेंड्स क्रिकेटचा सामना होणार होता, पण तो रद्द करावा लागला होता. पण आता भारत हा पाकिस्तानबरोबर का खेळत आहे, याचे कारण आता समोर आला आहे.
अनुराग ठाकूर यांनी भारत आणि पाकस्तान सामन्याबाबत म्हटले आहे की, ज्या स्पर्धांमध्ये दोनपेक्षा जास्त संघ असतात, ज्या स्पर्धा आयसीसी किंवा आशियाई संघटना आयोजित करते, त्या स्पर्धेत कोणत्याही देशाची अपरिहार्यता असते की त्यामध्ये खेळणे. जर भारताने पाकिस्तानबरोबर या स्पर्धेत खेळायचे नाही, असे ठरवले तर त्यांना आपले गुण गमवावे लागतील. त्यामुळे आशिया कपमध्ये भारताला खेळावे लागेल. पण भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत द्विदेशीय मालिका खेळणार नसल्याचे भारत सरकारने स्पष्ट केले आहे. बऱ्याच वर्षांपासून आम्ही निर्णय घेतला आहे की, पाकिस्तानबरोबर कोणतीही मालिका खेळायची नाही, असे ठरवले आहे.

जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी कारवाया थांबवत नाही, तोपर्यंत भारत त्यांच्याबरोबर खेळणार नाही, हे आम्ही स्पष्ट केले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कपमध्ये प्रथमच क्रिकेटचा सामना होणार आहे. पण हा सामना खेळवला जाऊ नये, यासाठी भारतामध्ये जोरदार विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे.