Sunday, September 14, 2025
HomeUncategorizedदणका ! नवरात्रीपासून सोन्याच्या मेकिंग चार्जवर 5 टक्के GST ; दागदागिने...

दणका ! नवरात्रीपासून सोन्याच्या मेकिंग चार्जवर 5 टक्के GST ; दागदागिने होईल महाग

अकोला दिव्य न्यूज : सोन्यावर सध्या ३ टक्के वस्तू व सेवा कर (GST) लागू आहे, मात्र GST २.० सुधारणांनुसार २२ सप्टेंबर २०२५ पासून सोन्याच्या मेकिंग चार्जवर ५ टक्के जीएसटी दर लागू होणार आहे. सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याच्या किमतीवर ३% जीएसटी लागतो, तर दागिन्यांवर अतिरिक्त ५ टक्के मेकिंग चार्जेस लागू होणार आहे. म्हणजे दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचे आभुषण आणि चांदीच्या वस्तूंची खरेदी ५ टक्क्यांनी महाग होईल.( सर्वात शेवटी दिलेला तक्ता वाचा)

GST परिषदेच्या 56 व्या बैठकीत वस्तू व सेवा कर (GST) सध्याच्या 5,12, 18 आणि 28 टक्क्यांच्या चार स्लॅब रचनेवरून 5 आणि 18 टक्के या दोन दरांच्या रचनेपर्यंत सुलभ करून GST सुधारणांची घोषणा करण्यात आली. हे नवे GST दर 22 सप्टेंबर 2025 पासून अर्थात नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लागू होतील. सोन्यावर ३ टक्के जीएसटी दर हा जीएसटी लागू झाल्यापासून सुरू आहे, मात्र GST 2.0 अंतर्गत सोन्या-चांदीच्या दागिन्यांवरील GST 3 टक्क्यांवर कायम राहणार असून मेकिंग चार्जेसवर अतिरिक्त 5 टक्के GST राहणार आहे. दरम्यान, सोन्याची नाणी आणि बारवर 3 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.

सोन्याच्या दागिन्यांवरील ३ टक्के जीएसटी हा सोन्याच्या मूल्यावर लागतो. आता दागिन्यांवर आकारल्या जाणाऱ्या मेकिंग चार्जेसवर अतिरिक्त ५% कर आकारला जाणार आहे, ज्यामुळे दागिन्यांची एकूण किंमत वाढणार आहे. प्रत्येक सराफा व्यावसायिकांचे मेकिंग चार्ज वेगळे वेगळे असल्याने दागिन्यांच्या विक्री भावात तफावत राहील. सोन्याचे दागदागिने जीएसटी शिवाय खरेदी करणे शक्य नाही. जीएसटीमुळे सोन्याची तस्करी आणि बेकायदेशीर खरेदी वाढू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.

GST 2.0 सुधारणा:
२२ सप्टेंबर २०२५ पासून लागू होणाऱ्या GST 2.0 अंतर्गत, सोन्यावरील मेकिंग चार्जवर ५% जीएसटी दर लागू होईल.
दागिन्यांवरील कराचे स्वरूप
सोन्याच्या दागिन्यांवरील ३ टक्के जीएसटी हा सोन्याच्या मूल्यावर लागतो. आता दागिन्यांवर आकारल्या जाणाऱ्या मेकिंग चार्जेसवर अतिरिक्त ५% कर आकारला जातो, ज्यामुळे दागिन्यांची एकूण किंमत वाढणार आहे. प्रत्येक सराफा व्यावसायिकांच्या मेकिंग चार्ज वेगळे वेगळे असल्याने दागिन्यांचे विक्री भावात तफावत राहील.

GST चा कसा परिणाम होणार?

भारतात 10 ग्रॅम सोन्याचे दागिने खरेदी करताना सोन्याच्या किमतीवर 3 टक्के GST आणि मेकिंग चार्जेसवर 5 टक्के अतिरिक्त जीएसटी भरावा लागणार आहे.

सोन्याचा भाव: 10,650 रुपये प्रति ग्रॅम

एकूण सोन्याचे मूल्य (10 ग्रॅम): 10,650 रुपये × 10 = 1,06,500

मेकिंग चार्जेस (सोन्याच्या किमतीच्या 10 टक्के गृहीत धरलेले): 10,650 रुपये

सोन्यावरील GST (1,06,500 रुपयांच्या 3 टक्के) : 3,195 रुपये

मेकिंग चार्जेसवरील GST (10,650 च्या 5 टक्के) : 532.5 रुपये

एकूण GST: 3,195 + 532.5 = 3,727.5

एकूण देय रक्कम : 1,06,500 + 10,650 + 3,727.5 = 1,20,877.5

याप्रमाणे सोन्याच्या मुळ किंमतीवर सध्या सरकार ३ टक्के जीएसटी तरह घेतच आहे आता मेकिंग चार्जवर ५ टक्के सीएसटी लागू केल्ताने ग्रामीण बहिणीच्या काळ्यापोथेतील सोन्याचे मणी, डोरले, एकदाणी व काळ्या मणीतील मंगळसूत्र अधिक महाग होईल

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!