अकोला दिव्य न्यूज : शहरातील काही युवकांनी औरंगजेबाच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करून हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. हिंदवी स्वराज्य स्थापन करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे सुपुत्र छत्रपती संभाजी महाराजांवर अमानुष अत्याचार करणाऱ्या औरंगजेबाला हा सन्मान देण्यामागे कुठली मानसिकता आहे. असा प्रश्न उपस्थित करून महानगर शिवसेनेने या घटनेच्या निषेधार्थ ज्या ठिकाणी दुग्धाभिषेक केला. त्या ठिकाणचे गोमूत्र, गंगाजलने मंत्रोच्चार करून तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन पं.लोकेश तिवारी पं.देवेद्र शर्मा पं.राजेशज सुरोलीया पं.धिरजजी तिवारी हस्ते करण्यात आले.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तीन आरोपींना अटक स केली. परंतु सदर आरोपी रिक्षावाले मजूर असून या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे याचा शोध प्रशासनाने घ्यावा अशी मागणी करण्यात आली.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अश्विन नवले, महानगर प्रमुख योगेश अग्रवाल, शहर प्रमुख रमेश गायकवाड, अविनाश मोरे, शशिकांत चोपडे, अकोला पुर्व शहर प्रमुख अँड.पप्पू मोरवाल, सागर पूर्णेय, मधुकर सोनारगन, उपशहर प्रमुख गणेश गोगे, सुमित पानझडे, शिवम पुरोहित, राजेश दांडेकर, भूषण इंदोरीय, सचिन पाचपोर, आकाश दलाल, गोपाल नागपुरे, रवि देशमाने, अविनाश खुनोरे, आकाश वक्ते, अनिकेत दुबे,प्रतीक मानेकर, हेमंत तांदळे, प्रफुल दांदळे, महेश बघेरे, राजेश पिंजरकर, रवींद्र देशमुख, राजेश दांडेकर, पंकज डोईफोडे, योगेश जवंजाळ, ममता जैन, संगीता शुक्ला, जयश्री पवार

शितल गिरी, उज्वला इंगळे, किशोर गाडगे, नागेश इंगोले, नितीन गांगलवार, संदेश काजळकर, अतुल बोके, गोपाल सरोदे, भावेश नवले, श्याम वाघिले, वैभव बोरचाटे,विक्रम जयसिंगकर, राजेश दुबे, हेमंत सोनार, भानुदास गोंधळेकर,, नितेश दुबे, धनराज लोमटे, उमेश लांडगे, प्रतीक आमकर, विनोद अग्रवाल विकास लाडके आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.