Saturday, May 18, 2024
Home ताज्या घडामोडी मोठी बातमी : 'वंचित’ची उमेदवारी मागे ! सोलापुरात भाजपविरोधी मतविभागणी टळणार

मोठी बातमी : ‘वंचित’ची उमेदवारी मागे ! सोलापुरात भाजपविरोधी मतविभागणी टळणार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : सोलापूर लोकसभा राखीव मतदारसंघात एकीकडे एमआयएमने उमेदवार उभा केलेला नसताना दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांनीही उमेदवारी मागे घेतली आहे. भाजपविरोधी मतविभागणी टाळण्यासाठी आपण माघार घेतल्याचे सांगताना गायकवाड यांनी वंचित बहुजन आघाडीच्या स्थानिक कार्यकारिणीची कार्यपध्दती आंबेडकरी चळवळीला पोषक नसल्याचा आरोप केला आहे.सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपचे राम सातपुते यांच्यात मुख्य तुल्यबळ लढत होत असताना त्यात वंचित बहुजन आघाडीचे राहुल काशीनाथ गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांनी प्रचाराला सुरूवात करण्यापूर्वी पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद वाढविला होता. परंतु सोमवारी दुपारी त्यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज मागे घेतला.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या दालनात जाऊन गायकवाड हे उमेदवारी अर्ज मागे घेत असताना तेथे वंचित बहुजन आघडीचे जिल्हाध्यक्ष मडिखांब हे धावत आले. त्यांच्या हालचाली पाहून निवडणूक अधिकाऱ्यांनी पोलिसांना पाचारण करून मडिखांब यांना ताब्यात घेण्याचे आदेश दिले. नंतर त्यांची सुटका झाली.

उमेदवारी माघार घेण्याच्या निर्णयाबाबत भूमिका स्पष्ट करताना गायकवाड यांनी सोलापुरात आंबेडकरी जनता चळवळीसाठी संवेदनशील आहे. मात्र पक्षाची कार्यकारिणी चळवळीसाठी पोषक नाही. त्यात पोकळपणा आहे. काही अपवाद वगळता अनेक दलालांची घुसखोरी झाली आहे. त्यांना सोबत घेऊन आपण निवडणुकीची लढाई करू शकत नाही. दुसरी बाब म्हणजे आपल्या उमेदवारीमुळे भाजपविरोधी मतविभागणी होऊन त्याचा फायदा भाजपला होईल आणि भाजपच्या विजयाचे वाटेकरी आपण होऊ इच्छित नाही. भाजपचा डॉ. आंबेडकरांचे संविधान बदलण्याचा डाव आहे.त्यासाठी त्या पक्षाचा खासदार निवडून पाठविण्यात आपला हातभार लागू नये म्हणून आपण उमेदवारी मागे घेतली आहे, असे स्पष्टीकरण गायकवाड यांनी दिले.

मागील २०१९ सालच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएम पक्षाची मदत घेऊन उभे राहून एक लाख ७० हजार मते घेतली होती. त्यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे एक लाख ५८ हजार मतांनी पराभूत झाले होते. भाजपविरोधी मतविभागणीमुळे भाजपचे डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी हे निवडून आले होते. त्याची पुनरावृत्ती पुन्हा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत होणार की काय, याबाबत प्रश्नार्थक चर्चा सुरू होती. त्यात एमआयएमने उमेदवार उभा न करण्याची भूमिका घेतली. तर वंचित बहुजन आघाडीचे राहुल गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे पुन्हा भाजपविरोधी किमान मतविभागणी होण्याची शक्यता वर्तविली जात असताना अखेर गायकवाड यांनी माघार घेतली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांना दिलासा मिळाल्याचे मानले जाते.

RELATED ARTICLES

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

पंतप्रधान मोदी म्हणतात,आमच्या घरीही ईद साजरी व्हायची ! माझ्या घरी सर्व मुस्लिम कुटुंबातून जेवण यायचे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : माझ्या घराभोवती सर्व मुस्लिम कुटुंबे होती. आमच्या घरीही ईद साजरी व्हायची. इतर सणही साजरे केले जायचे. ईदच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

आता संघाची गरज नाही ! भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांचं मोठं भाष्य : भाजपा आता स्वयंपूर्ण झाली आहे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचं आपापसात नेमकं नातं कसं आहे? याबाबत अनेकदा चर्चा होताना...

… आणि बुद्ध हसला ! भारताच्या पहिल्या यशस्वी अणुस्फोट चाचणीला आज 50 वर्षे पूर्ण

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावाने अलिकडच्या काळात कडाकड बोटे...

मृत्यूदंड ! अकोला जिल्ह्यातील 3 जणांना फाशी : अकोट सत्र न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शेतीच्या वारसाहक्काला घेऊन भाऊ आणि बहीण यांच्यात सुरू असलेला वाद विकोपाला जाऊन, बहिणीने आपल्या पती व...

ममता बॅनर्जी तुमची किंमत किती? माजी न्यायाधीश, भाजपा नेते अभिजीत गंगोपाध्याय यांचे आक्षेपार्ह विधान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : कोलकाता उच्च न्यायालायचे न्यायाधीश आणि भाजपाचे उमेदवार अभिजीत गंगोपाध्याय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख...

Recent Comments

error: Content is protected !!