Friday, May 9, 2025
HomeUncategorizedइंजि.दिनेश ढगे यांची 'क्रेडाई' च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अविरोध निवड

इंजि.दिनेश ढगे यांची ‘क्रेडाई’ च्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अविरोध निवड

अकोला दिव्य न्यूज : पश्चिम विदर्भातील बांधकाम क्षेत्रातील ख्यातनाम बिल्डर्स आणि स्थापत्य अभियंता दिनेश ढगे यांची बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय स्तरावरील शिखर संस्था असलेल्या ‘क्रेडाई’ संघटनेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा या दोन प्रदेशातून एकमेव बांधकाम व्यवसायी दिनेश ढगे यांची निवड झाली आहे.क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील ख्यातनाम बिल्डर्स व व्यावसायीक सतीश मगर, शांतीलाल कटारीया आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमताने निवड केली आहे.

अकोला बिल्डर्स असोसिएशनच्या स्थापनेपासूनच जिल्ह्यातील बांधकाम व्यवसायातील विविध समस्या, शासन निर्णयानंतर निर्माण होणाऱ्या अडीअडचणी तसेच स्थानिक पातळीवरील प्रश्नांना निकाली काढण्यात सर्वसमवेत सक्रिय सहभाग घेऊन ढगे यांनी संघटना वाढीसाठी हातभार लावला. विशेष म्हणजे बांधकाम व्यवसायाशी निगडीत विविध वस्तू, बदलते तंत्रज्ञान आणि वित्तीय संस्था असा ”मटेरिका” नावाने होणारे आयोजन अकोला बिल्डर्स असोसिएशनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. दिनेश ढगे यांनी बिल्डर्स असोसिएशनचे अध्यक्षपद भूषविले आहे. कालांतराने बिल्डर्स असोसिएशनचे नामकरण क्रेडाई झाले आणि क्रेडाईचे अध्यक्ष असताना ‘मटेरिका २०२३’ चे आयोजन यशस्वीरीत्या पार पडले. त्यांच्या या सन्मानासाठी सर्वच स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!