अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्रात नावलौकिक पश्चिम विदर्भातील ४० वर्षाची परंपरा असलेली अकोला शहरातील ऐतिहासिक श्रीराम नवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून सदैव कार्यरत श्री सालासर बालाजी मंदिर ट्रस्टचे संस्थापक शैलेंद्र (बंटी) कागलीवाल यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

विश्व हिंदू परिषदेद्वारे संचालित आणि लाखो भाविकांच्या साक्षीने सहभाग व दरवर्षी वाढत चाललेल्या भाविक भक्तांच्या उपस्थितीत अकोला शहरात निघणारी श्रीराम नवमी शोभायात्रा नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा भव्य-दिव्य स्वरूपात व उत्साहात साजरी करण्यात येते आहे.सुरुवातीला छोट्या प्रमाणात सुरू झालेल्या शोभायात्रेला अकोल्याचे दिवंगत आमदार गोवर्धन शर्मा यांच्या प्रयत्नातून शोभायात्रेला एक वेगळेच वलय निर्माण झाले आहे.

दरवर्षी प्रतिष्ठित व्यापारी उद्योजक, गणमान्य नागरिक व रामभक्त व्यक्तींची रामनवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त केली जाते. या अनुषंगाने झालेल्या एका बैठकीत रामनवमी शोभायात्रा समितीच्या अध्यक्षपदी बंटी उर्फ शैलेंद्र कागलीवाल यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत सहमंत्री गणेश काळकर, विश्व हिंदू जनकल्याण परिषदेचे प्रांत अध्यक्ष राहुल राठी, अकोला जिल्हाध्यक्ष प्रकाश लोढीया, बजरंगदलाचे प्रांत सह संयोजक सुरज भगेवार, रामनवमी शोभायात्रा समितीचे मार्गदर्शक अशोक गुप्ता, कृष्णा गोवर्धन शर्मा, ब्रिजमोहन चितलांगे, विहिप विभाग मंत्री संजय दुबे, विभाग संयोजक हरिओम पांडे, अमर कुकरेजा, राजूभाऊ मंजुळकर, निलेश पाठक, रामप्रकाश मिश्रा, शैलेश खरोटे, प्रकाश घोगलिया, गोविंद कागलीवाल, नवीन गुप्ता,

संजय अग्रवाल, संदिप निकम, योगेश खंडेलवाल, रोशन जैन, आकाश ठाकरे, संतोष बोर्डे, मनोज कस्तुरकर, रेखा नालट अर्चना शर्मा, पुष्पा वानखडे, संदिप वाणी, बाळ बिडवई, विलास अनासने, नितीन जोशी, संतोष शर्मा, मनीषा भुसारी,कल्पना अडचुले, सारिका देशमुख, मालती रणपिसे, छाया तोडसाम, संगीता जानोरकर, चित्राताई बापट, निरंजन अग्रवाल, प्रशांत लोहीया, अरविंद अग्रवाल, दीपक बजाज, रितेश चौधरी, अक्षद कागलीवाल ,ओमप्रकाश अग्रवाल, संजय अग्रवाल,पवन मित्तल, दिलीप गोयनका,अशोक सोनालावाला,अमोल गांवडे,महेंद्र खेतान तसेच सर्व कार्यकर्ते, महिला आणि सदस्य उपस्थित होते.

देशभरातील या शोभायात्रा श्रीराम जन्मभूमी आंदोलनाची पहिली पायरी म्हणून ओळखल्या जातात आणि त्याचा परिणामी गतवर्षी 22 जानेवारीला भव्य स्वरूपात नव्याने बांधलेल्या श्रीराम जन्मभूमी मंदिरात श्रीराम यांच्या विग्रहाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, त्यामुळे राम भक्तांमध्ये प्रचंड उत्साह देशभरात निर्माण झालेला आहे. तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुढाकाराने वर्ष 1986 मध्ये जेव्हा राम मंदिराचे टाळे उघडल्या गेले. तेव्हापासून देशभरात विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून रामनवमी शोभायात्रा सुरू करण्यात आली आणि तेव्हापासूनच अकोल्यात रामनवमी शोभायात्रा काढण्यात येत आहे.
