Wednesday, April 30, 2025
HomeUncategorizedNo मॅजिक-Only लॉजिक ! १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ

No मॅजिक-Only लॉजिक ! १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ

अकोला दिव्य न्यूज : जयपूरच्या मैदानात रंगलेल्या गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावून वर्ल्ड रेकॉर्ड सेट केल्यावर वैभव सूर्यंवशीनं कडक सिक्सरसह  ३५ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले. आयपीएलच्या इतिहासात भारतीय फलंदाजाने केलेले हे सर्वात जलद शतक ठरले.

याआधी हा विक्रम युसूफ पठाणच्या नावे होता. त्याने ३७ चेंडूत शतक साजरे केल्याचे पाहायला मिळाले होते. या यादीत युनिवर्सल बॉस ख्रिस गेल सर्वात आघाडीवर आहे. याशिवाय अर्धशतकासह टी-२- क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात शतक झळकवण्याचा विक्रम आता वैभव सूर्यंवशी याच्या नावे झाला आहे. 

गेलच्या पाठोपाठ लागतो १४ वर्षीय पोराचा नंबर
आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ख्रिस गेल  अव्वलस्थानावर आहे.  २०१३ च्या हंगामात त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातून खेळताना पुणे वॉरियर्स विरुद्ध ३० चेंडूत शतक झळकावले होते.  त्या पाठोपाठ आता वैभव सूर्यंवशीचा नंबर लागतो. त्याने ३५ चेंडूत शतक साजरे केले.

१४ वर्षाच्या या पोरानं १५ वर्षांपासून अबाधित असणारा युसूफ पठाणचा रेकॉर्ड मोडीत काढला. युसूफ पठाण याने राजस्थानकडून खेळतानाच २०१० च्या हंगामात ३७ चेंडूत शतक झळकावले होते.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात वैभव सूर्यंवशी याने ३८ चेंडूत ७ चौकार आणि ११ षटकाराच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत त्याने अनेक विक्रम प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळाले.

पदार्पणाच्या सामन्यात षटकारासह खाते उघडत त्याने यंदाच्या हंगाम गाजवण्याचे संकेत दिले होते. तिसऱ्या सामन्यात २०० धावांचा पाठलाग करताना त्याने मोठा धमाका केला.
जयपूरच्या मैदानात रंगलेल्या आयपीएल सामना हा ऐतिहासिक ठरला. कारण वैभव सूर्यंवशी नावाच्या १४ वर्षांच्या पोरानं शतकी खेळीसह मैदानं गाजवलं. टी-२० क्रिकेटमधील सर्वात कमी वयात अर्धशतकवीर होऊन समाधान न मानतो त्याने शतकवीर होण्याचा  पराक्रम करून दाखवला.

आंतरराष्ट्रीय मैदानात धाक असलेल्या गोलंदाजांसमोर त्याने ज्या तोऱ्यात बॅटिंग केली ते बघून हा एक चमत्कार आहे, असंही वाटू शकतं. सोशल मीडियावर सध्या एकच नाव गाजतंय ते म्हणजे वैभव सूर्यंवशी. या पोराच्या शतकाच कौतुक करण्यासाठी क्रिकेटचा देवही मागे राहिलेला नाही. शतकाचा बादशहा सचिन तेंडुलकर याने १४ वर्षाच्या पोराचं शतकी खेळीच कौतुक करताना त्याच्या खेळीमागंच लॉजिकही सांगितलंय.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!