अकोला दिव्य न्यूज : Maharashtra SSC Results Online on mobile: राज्यात बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा दहावीच्या निकालाकडे लागल्या आहेत. दहावीच्या निकालाची सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे. एकीकडे सगळ्या बोर्डांचे निकाल जाहीर आहेत. या दरम्यान आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याची अपडेट समोर आली आहे. आज म्हणजेच १३ मे रोजी १० वीचा निकाल जाहीर होणार आहे.

यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यानंतर विद्यार्थ्यासमोबतच पालकही निकालाची वाट पाहत होते, मात्र ही प्रतीक्षा अखेर संपली आहे. महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल आज, अधिकृत संकेत स्थळावर दुपारी १ वाजता पाहता येणार आहे. आज दुपारी १ वाजता विद्यार्थ्यांना बोर्डाच्या आणि अन्य संकेतस्थळांवर आपला निकाल पाहता येईल. त्यानंतर आपापल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येईल.
Opens in new window
जेव्हा निकाल खरोखरीच जाहीर होईल तेव्हा साहजिकच एकाच वेळी साईटवर लोड आल्याने क्रॅश होण्याची शक्यता असते. अशावेळी तुम्ही आपल्या मोबाईल फोनवर सगळ्यात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करू शकता.
निकाल साईटवर कसा तपासायचा?
https://results.digilocker.gov.in
https://sscresult.mahahsscboard.in
http://sscresult.mkcl.org
https://results.targetpublications.org
मोबाईलवर SMS मध्ये कसा समजेल निकाल?
दहावीच्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना आपल्या मोबाइलवरुन देखील दहावीचा निकाल पाहता येणार आहे. अनेकदा निकालाच्या वेळेस वेबसाइट या क्रॅश होतात किंवा इंटरनेट उपलब्ध नसेल तर SSC निकाल हा त्यांना SMS द्वारे पाहाता येणार आहे.
SMSद्वारे एसएससीचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना “MHSSC” असं टाकून 57766 वर SMS पाठवायचा आहे. त्यानंतर निकाल त्यांच्या फोनवर SMSच्या स्वरुपात येईल.
अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन
दहावीची निकाल लागल्यानंतर विद्यार्थी आणि पालक यांची अकरावीच्या प्रवेशासाठी अनेक कॉलेजच्या खेटी घालाव्या लागतात. विद्यार्थी आणि पालक यांची गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र बोर्डानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र बोर्डानं यंदा अकरावीची संपूर्ण प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीनं करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबची माहिती बोर्डानं एक प्रसिद्धीपत्रक जारी करून यापूर्वीच दिली आहे.