अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या आज जाहीर करण्यात आलेल्या निकालामध्ये स्थानिक रामदास पेठ स्थित सन्मित्र पब्लिक स्कूलचा निकाल दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा शंभर टक्के लागला आहे. शाळेने सतत सात वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा अबाधित राखली आहे.

सन्मित्र पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखत वैयक्तिकरित्या उत्कृष्ट गुण संपादित केले आहे .यावर्षी सुद्धा मुलींनी गुणवत्ता यादीत अव्वल राहण्याचा मान मिळवला आहे.यामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान संस्कृती मोहन भटकर १०० टक्के ,द्वितीय क्रमांक किशन कसबेकर व ईशा लासुरकर ९५% ,तृतीय क्रमांक अंशुमन कोंडे ९४.८०%, चौथा क्रमांक स्वराज वानखडे ९४.४०% आणि पाचवा क्रमांक प्रणव ढेंगळे ९३.४०% घेऊन याने मिळवला आहे.तर अंश धवणे ९२.६०%,गौरव सोळंके ९२.४०% ,तृप्ती अघडते ८९.४० % सोहम देशमुख ८९%, सुजल पवार ,८७.२०% मनाली काळे ८४.६०, गौरव दवंडे ८४.४०, देशील मस्करे ८३.२०%, सायली मुरूम कार ८२.६०%, अभिजीत डोंगरे ८५%, प्रणोती प्रधान ७९%, प्रथमेश तायडे ७८.४०%, रोहित अहिर ७७.६०%, गणेश सांगळे ७७.२०%, सिद्धांत पाटील ७६.८०%, काविश खान ७६.४०%, राम हातोलकर ७६%, श्रुती धांडे ७५.२०%, गुण घेऊन तर शाळेचे एकूण 36 विद्यार्थी डिस्टिंक्शन ग्रेडमध्ये उत्तीर्ण झालेले आहेत तर चार विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेले आहेत. विषयवार निकालामध्ये इंग्रजी भाषेत सर्वोत्तम प्रणव ढेंगळे 91 गुण ,मराठी भाषेत संस्कृती भटकर 97 गुण हिंदी संस्कृत संयुक्त भाषेत सर्वोत्तम ईशा लासुरकर व अंशुमन कोंडे 97 गुण, गणित विषयांमध्ये सर्वोत्तम संस्कृती भटकर 99 गुण, विज्ञान विषयांमध्ये सर्वोत्तम संस्कृती भटकर 97 गुण आणि सामाजिक शास्त्रामध्ये सर्वोत्तम संस्कृती भटकर 99, गुण घेऊन अव्वल राहिले आहेत.


विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल पालकांनी संस्थेचे कौतुक केले आहे व सर्व गुरुजनांचे आभार व्यक्त केले .तसेच शाळेच्या प्राचार्या सौ. मनीषा राजपूत यांच्या कुशल नेतृत्वामध्ये वर्षभर उत्कृष्ट राबवले जाणारे विविध शालेय उपक्रम, ४ सराव परीक्षा, समयोचित मार्गदर्शन व नियोजन व प्रोत्साहन यामुळे विद्यार्थ्यांना यशाची परंपरा कायम राखता आली आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सिंह राजपूत यांनी सर्व विद्यार्थ्यांचे पालकांचे,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व प्राचार्या मनीषा राजपूत यांचे कौतुक व अभिनंदन केले.

त्याचप्रमाणे सर्व क्षेत्रांमध्ये यशाची हीच परंपरा कायम राखावी अशा शुभेच्छा दिल्या आहेत.शाळेच्या प्राचार्या सौ मनीषा राजपूत यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे पालकांचे अभिनंदन केले आहे व त्यांना भावी उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.