अकोला दिव्य न्यूज : अकोला शहरातील रतनलाल प्लॉट येथील एक आणि गांधी रोडवरील तीन असं चार सराफा व्यावसायिकांच्या दुकानावर आज बुधवार १४ में २०२५ रोजी सकाळी ७ वाजताच्या सुमारास एकाच वेळी छापा टाकून तपासणी सुरू करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी छापे आयकर विभागाने घातल्याचे दिसून येते. मात्र अधिकृतपणे या वृत्ताला दुजोरा मिळाला नाही. तपासणीसाठी चार चमू असून यामधिल अधिकारी व कर्मचारी हे मुंबई आणि औरंगाबाद येथील असल्याची माहिती आहे. ही छापा कारवाई जीएसटी विभागाची असू शकते.अशी ही शक्यता गृहित धरली जात आहे.

अलिकडच्या काळात सोनं आणि चांदीच्या भावात होणारा चढ उतार आणि ग्राहकांच्या सोने विक्रीचे वाढते प्रमाण लक्षात घेता ही कारवाई केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अकोला शहरातील रतनलाल प्लॉट नेकलेस रोडवरील एकता ज्वेलर्स आणि गांधी रोडवरील प्रकाश ज्वेलर्स तर तहसील कार्यालय समोरील पुनम ज्वेलर्स आणि शनी मंदीर जवळ ईशा ज्वेलर्स या चार दुकानांवर हे छापे असून सकाळी ७ वाजता कारवाईला सुरूवात झाली आहे.
बातमी अपडेट होत आहे….