देशविदेशातून २५ हजार तर अकोला जिल्ह्यातून १०० हून अधिक हिंदू उपस्थित रहाणार !
अकोला दिव्य न्यूज : सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा ८३ वा जन्मोत्सव व संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून, ‘विश्वकल्याणार्थ रामराज्यसमान सनातन राष्ट्रा’चा शंखनाद करण्यासाठी गोव्यात १७ ते १९ मे २०२५ या कालावधीत ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे ऐतिहासिक आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात देशविदेशातून २५ हजाराहून अधिक साधक, तर अकोला जिल्ह्यातून १०० पेक्षा जास्त धर्मप्रेमी हिंदू सहभागी होणार असल्याची माहिती सनातन संस्थेच्या श्रीमती प्रतिभा जडी यांनी दिली.

हिंदुत्ववादी, साधक, उद्योजक, अधिवक्ता यांची हॉटेल मिर्च मसाला येथे झालेल्या बैठकीत हिंदू राष्ट्र समन्वय समितीचे संयोजक उदय महा, शिवसेना अकोला महानगर प्रमुख योगेश अग्रवाल ॲड.मंजू सावरकर, महाराष्ट्र मंदिर महासंघाचे सदस्य प्रमोद अग्निहोत्री, राजू मंजुळेकर, हिंदू जनजागृती समितीच्या अश्विनी सरोदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवात ‘धर्मेण जयति राष्ट्रम्’ यासाठी एक कोटी श्रीराम नामजपचा सामूहिक संकल्पासाठी देशातील संत, महंत, धर्मगुरू यांच्याशी संवाद साधला जाईल. तसेच ‘हिंदू राष्ट्ररत्न’ आणि ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार आणि धर्मसेवेसाठी समर्पित वीरांना जीवनगौरव व धर्मरक्षक पुरस्कार संतांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यासोबतच लोककलेचे सादरीकरण व शिवकालीन शस्त्रांचे प्रदर्शन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शस्त्र, राष्ट्र, संस्कृती, आयुर्वेद, अध्यात्म यांचे प्रदर्शन आयोजित केले आहे
विश्वकल्याणासाठी आणि आरोग्यासाठी विशेष महाधन्वंतरी यज्ञ १९ मे रोजी करुन महोत्सवाची सांगता करण्यात येईल.
मह प्रमुख पाहुणे म्हणून श्री.श्री रविशंकर, स्वामी रामदेव,स्वामी गोविंददेव गिरि, देवकीनंदन ठाकूर महाराज, केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, डॉ.प्रमोद सावंत, मुख्यमंत्री विष्णुदेव साय, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार टी. राजा सिंह आणि काशी-मथुरा खटले चालविणारे अँड. विष्णू जैन व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.