Saturday, May 17, 2025
HomeUncategorizedभाजपचे गटरछाप मंत्री म्हणाले, भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक ! वाद...

भाजपचे गटरछाप मंत्री म्हणाले, भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक ! वाद उफळताच सावरासारव

अकोला दिव्य न्यूज : भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचे उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांनी कौतुक केले. ऑपरेशन सिंदूरबद्दल बोलताना मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री देवडा म्हणालेले की, ‘संपूर्ण देश, देशाचे लष्कर आणि जवान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.’ त्यांच्या या विधानावरून वाद उफाळला. सगळीकडून टीका सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवडा यांनी सावरासारव केली. उपमुख्यमंत्री जगदीश देवडा यांच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल झाला. या विधानावरून त्यांच्या टीका सुरू झाली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवडा यांनी खुलासा केला. 


जगदीश देवडा यांनी काय केला खुलासा?

उपमुख्यमंत्री देवडा म्हणाले, ‘जबलपूरच्या नागरी-लष्करी स्वयंसेवक प्रशिक्षण कार्यक्रमात मी जे बोललो, ते चुकीच्या पद्धतीने आणि मोड तोड करून प्रसिद्ध करण्यात येत आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. मी माझ्या भाषणात म्हणालो होतो की, दहशतवाद्यांविरोधात लष्कराच्या धाडसी जवानांनी ऑपरेशन सिंदूर करून जो पराक्रम केला; त्याचे जितके कौतूक करावे तितके कमी आहे. संपूर्ण देश आणि देशातील जनता सैन्याच्या चरणी नतमस्तक आहे. मी सुद्धा त्यांना प्रमाण करतो.
जगदीश देवडा यांच्यावर टीकेचा भडीमार का? खरंतर या वादाची सुरूवात झाली जगदीश देवडा यांच्या भाषणाच्या एका व्हिडीओ क्लिपमुळे. जबलपूरमध्ये बोलताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला होता. ते म्हणाले होते की, ‘संपूर्ण देश, देशाचे लष्कर आणि जवान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चरणी नतमस्तक आहेत.

X वर पोस्ट व्हिडिओ पहा

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!