अकोला दिव्य न्यूज : अकोला एमआयडीसी परिसरातून बिअर घेऊन जाणारी गाडी खडकी परिसरातील राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर पलटी झाली. यावेळी परिसरातील नागरिकांनी चालक आणि वाहकाला मदत करण्याऐवजी बिअर लुटण्यासाठी धूम ठोकली होती. या अपघातात चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाले. मात्र, अपघात पाहून मदत करण्याऐवजी नागरिकांनी बिअर लुटण्यासाठी एकच झुंबड उडवली.

लोकं बिअरच्या पेट्या व बाटल्या उचलण्यात गुंग होते. तर काही तळीरामांनी रस्त्यावरच बिअरचा आनंद लुटला. या घटनेमुळे माणुसकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. काही वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि झुंबळ पळवली. मात्र तोपर्यंत बिअरची गाडी लुटून रिकामी झाली होती, आता या अपघाताचा तपास पोलीस करत आहेत.
या घटनेचे प्रत्यक्षदर्शी सचिन हुंडीवाले यांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, जेथे ट्रकचा अपघात झाल्याचे माहिती होताच येथे आलो तेव्हा पाहिलं की, बिअर आणि वाईनचा ट्रक पलटी झाला होता. ड्रायव्हर आणि इतर एकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान गर्दी तुटून पडली.अपघातात ड्रायव्हर आणि गाडीतील आणखी एकाला जास्त दुखापत झाली नाही. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही. अशी माहिती दिली.