Saturday, June 7, 2025
HomeUncategorizedराष्ट्रीय संमेलनात जेष्ठ उद्योजक रमाकांत खेतान 'फॅम गौरव' पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रीय संमेलनात जेष्ठ उद्योजक रमाकांत खेतान ‘फॅम गौरव’ पुरस्काराने सन्मानित


अकोला दिव्य न्यूज : फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात “फॅम”च्या वतीने मुंबई येथे व्यापारी एकता दिनावर संपन्न झालेल्या राष्ट्रीय व्यापारी परिषदेत फॅमचे प्रदेश उपाध्यक्ष, उद्योजक रमाकांत खेतान यांना ‘फॅम गौरव’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

राज्यातील व्यापारी व उद्योजकांची शिखर संस्था असलेल्या फॅमचे व्यापारी दिनानिमित्त राष्ट्रीय संमेलन मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात नुकतेच संपन्न झाले. या संमेलनात राष्ट्रीय स्तरावरील 500 पेक्षा अधिक व्यापारी व उद्योजकांनी सहभाग घेतला.फॅमचे प्रदेश अध्यक्ष जितेंद्र शाह यांच्या अध्यक्षतेत संपन्न या सोहळ्यात राष्ट्रीय व्यापारी कल्याण बोर्डाचे अध्यक्ष खा.सुनील सिंधी, राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा, माजी मंत्री राज पुरोहित, भारतीय उद्योग व्यापार मंडळाचे अध्यक्ष बाबुलाल गुप्ता, फॅमचे महासचिव प्रितेश शाह,ज्येष्ठ उपाध्यक्ष जयकिसन पाठक, कॅटचे राष्ट्रीय मंत्री शंकर ठक्कर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी व्यापारी व उद्योजक एकता यावर भर देत व्यापारी, उद्योजकांनी व्यापारी व औद्योगिक प्रगती करून राष्ट्रीय प्रगतीत आपले योगदान द्यावे, तसेच तुर्की व अजरबैजान या देशाशी आपला व्यापार व उद्योग बंद करण्याचे आवाहन केले. यावेळी सुनील सिंधी यांनी व्यापारी उद्योजकांना 20 सूत्रीय कर्तव्याची शपथ दिली. फॅमच्या राष्ट्रीय स्तरावरील उपक्रमाने परिपूर्ण असणाऱ्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.

संमेलनात मान्यवरांच्या हस्ते व्यापार,उद्योग, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक विश्वात क्षेत्रात गत चाळीस वर्षापासून प्रामाणिकपणे सेवा बजावणारे फॅमचे प्रदेश उपाध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक रमाकांत खेतान यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व मोमेंटो देऊन गौरव करण्यात आला. यावेळी खेतान पश्चिम विदर्भात करीत असणाऱ्या व्यापारीक व व्यावसायिक सेवा कार्याचा आलेख सादर.संचालन फॅमचे सचिव सुशील कोठारी यांनी केले. या दोन दिवशीय राष्ट्रीय संमेलनात अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, जयपूर,पटना, लखनऊ, बंगलोर समवेत राज्यभरातील व्यापारी,मुंबई व 60 अन्य असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!