Thursday, June 5, 2025
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी घेतले नाट्यकलेचे धडे : सिने व नाट्य क्षेत्रातील दिग्गजांनी दिले प्रशिक्षण

विद्यार्थ्यांनी घेतले नाट्यकलेचे धडे : सिने व नाट्य क्षेत्रातील दिग्गजांनी दिले प्रशिक्षण

अकोला दिव्य न्यूज : शहरातील विविध शाळांमधील जवळपास 70 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन 10 दिवसीय नाट्य प्रशिक्षण शिबिरात नाट्य प्रशिक्षणाचे धडे घेतले.स्थानिक आर.डी.जी.महिला महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिबिराचा उत्साहात समारोप करण्यात आला. समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.डी.जी.कॉलेजच्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले तर प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात सिने दिग्दर्शक निलेश जळमकर, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, सिने निर्माते शत्रुघ्न बिरकड, सीआयडी, क्राइम पेट्रोल व विविध वेब सिरीज मध्ये भूमिका करणाऱ्या किरण ठाकरे पावसकर, प्रख्यात नाट्य प्रशिक्षक सौरभ ठाकरे उपस्थित होते.
प्रारंभी रंगभूमी देवता नटराज, भारतीय सेवा सदनाच्या संस्थापक अध्यक्षा राधादेवी गोयनका यांच्या प्रतिमांचे अतिथींच्या हस्ते पूजन करण्यात आले. सिद्धी गणेश प्रोडक्शनचे संचालक व आयोजक सचिन गिरी यांनी प्रास्ताविक करून या शिबिरातील घडामोडींची माहिती दिली.

प्रमुख अतिथी निलेश जळमकर, प्रदीप खाडे, शत्रुघ्न बिरकड, डॉ. चारुशीला रुमाले यांनी याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. सर्वांनी आपल्या मनोगतातून नाट्य व चित्रपट सृष्टीतील अनेक किस्से उपस्थितांसमोर कथन केले. याप्रसंगी प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी नृत्यासह विविध नाट्यछटा सादर करून आपण प्रशिक्षणात काय शिकलो याची प्रचिती उपस्थितांना दिली. या सर्व प्रशिक्षणार्थींना अतिथींच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

भारतीय सेवा सदनाचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, प्राचार्या डॉ. चारुशीला रुमाले, सचिन गिरी यांच्या संकल्पनेतून आयोजित शिबिर यशस्वीरित्या संपन्न झाले. या शिबिरात नाट्य क्षेत्रातील दिग्गज देवदत्त पाठक, हरीश इथापे, किरण पावसकर ठाकरे, सौरभ ठाकरे, मिलिंद केळकर यांनी प्रशिक्षणार्थींना नाट्यकलेचे धडे दिले. शिबिराच्या यशस्वीते करिता सचिन गिरी यांचे सह मंदार घेवारे, विष्णू क्षीरसागर, रोशन समदुरे, अश्विनी ठाकरे, महेश इंगळे, अक्षय पिंपळकर, मोनिका अनासने, स्वराज पाटोळे, प्रमोद वानखडे, साहिल सप्रे, गीता जोशी आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन तनया भोकरे यांनी केले. नाट्य क्षेत्रातील विष्णू निंबाळकरसह अनेक पालक व विद्यार्थी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!