Thursday, June 19, 2025
HomeUncategorizedअकोला अर्बन बँकेंची ६२ वी आमसभा उत्साहात संपन्न

अकोला अर्बन बँकेंची ६२ वी आमसभा उत्साहात संपन्न

अकोला दिव्य न्यूज : महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य मल्टीस्टेट शेडयुल्ड बॅक अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड अकोलाची ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा अकोला येथील बाजार समितीच्या गायवाडा शेतकरी भवन सभागृहात संपन्न झाली. सभेस अनेक गणमान्य भागधारक उपस्थित होते. सभेचे अध्यक्षस्थान शंतनु जोशी यांनी स्विकारले व सभेचे कामकाजास प्रारंभ झाला.

सभेच्या प्रारंभी अहवाल वर्षांत राजकीय नेते, संशोधक, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, साहित्यिक, सैनिक, कलावंत, शिक्षण तज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, आर्थिक व सहकार क्षेत्रातील मान्यवर, बॅकेचे सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक व कर्मचारी पंचतत्वात विलीन झालेत. तसेच पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले पर्यटक, विमान दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले प्रवासी व नागरिक तसेच कुंडमेळा मावळ येथील पूल कोसळण्याच्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेले पर्यटक यांना सभेमधे भावपुर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

त्यानंतर बॅकेचे अध्यक्ष शंतनु जोशी यांनी प्रास्ताविक केले. आपल्या प्रास्ताविकामधे सभेस उपस्थित सर्व भागधारकांचे त्यांनी स्वागत केले व अहवाल वर्षात बँकेने केलेल्या प्रगतीचा आढावा सभेसमोर सादर केला. ३१.०३.२०२५ अखेर बँकेचे वसुल भागभांडवल ७१.६८ कोटी आहे. राखीव व इतर निधी २१०.२२ कोटी आहेत. ठेवी रु.१७६०.५८ कोटी असुन कर्ज वाटप रु. १०००.६२ कोटी निव्वळ नफारु. १४.८० कोटी आहे. बॅकेच्या निव्वळ एन. पी. ओ. चे प्रमाण ०.०० टक्के आहे. सन २०२४-२५ करितासुद्धा भागधारकांना ६.५० टक्के दराने लाभांश वितरित करण्यात येणार आहे .बँकेच्या सक्षम आर्थिक स्थितीबद्दल सभेमधे समाधन व्यक्त करण्यात आले. या सर्व प्रगतीमधे भागधारक, खातेदार, ठेवीदार व कर्मचारी या सर्वांचे सहकार्य आहे. व भविष्यातही असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आपल्या प्रास्ताविकामधे अध्यक्षांनी व्यक्त केली. व सभेस उपस्थित सर्व भागधारकांचे आभार व्यक्त केले.

दि.१२.०७.२०२४ रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे प्रतिवृत्त बॅकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के यांनी सादर केले. त्यास सभेने मान्यता कायम केली. यानंतर विषय सुची नुसार विषय बॅकेचे उपाध्यक्ष राहुल राठी, संचालक संजय कोटक, केदार खपली, धनंजय पाटील,किरण खोत, शार्दुल दिगंबर यांनी सभेसमोर सादर केले. त्या सर्व विषयांस उपस्थित सभासदांनी मान्यता दिली.

सभेचे संचालन बँकेचे संचालक शार्दुल दिगंबर यांनी केले तर आभार प्रदर्शन बॅकेचे संचालक माधव बनकर यांनी केले. सभेस संचालक अमरिकसिंग वासरीकर, प्रमोद शिंदे, राहुल गोयनका, कैलाशनाथ मशानकर, संगीता गांधी, सीमा डिक्कर अति. मुख्य कार्यकारी अधिकारी राधेश्याम चिराणिया, कर्मचारी प्रतिनिधी पंजाब अव्हाळे यांच्यासह बॅकेचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ६२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!