Sunday, June 22, 2025
HomeUncategorizedअकोल्यातील धक्कादायक बातमी ! साईकेट्रिस्ट डॉक्टरची आत्महत्या

अकोल्यातील धक्कादायक बातमी ! साईकेट्रिस्ट डॉक्टरची आत्महत्या

अकोला दिव्य न्यूज : अकोल्यातील एक अतिशय धक्कादायक घटना समोर आली आहे.चक्क साईकेट्रिस्ट अर्थात मानसोपचार तज्ज्ञांने आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव प्रशांत जावरकर असून त्यांनी राहत्या घरी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. अकोला शहरातील प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ डॉ. केळकर यांच्यासोबत अनेक वर्षांपासून ते मानसोपचारतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते आणि रुग्णांचे समुपदेशन करत होते. अशाप्रकारचे पाऊल डॉक्टरनेच उचलल्याने विविध चर्चांना उधाण आलंय. डॉ. प्रशांत जावरकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करत आहेत.

अकोल्यातील सन्मित्र हॉस्पिटलमधील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी जीवन संपवल्याने शहर आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे. जावरकर हे मागील काही वर्षांपासून मानसोपचारतज्ज्ञ म्हणून काम करत होते. विशेष म्हणजे यादरम्यानच्या काळात त्यांनी अनेक मानसिक रुग्णांना आधार दिला. सन्मित्र हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक वर्षांपासून सेवा दिली.

वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ : समुपदेशन करणाऱ्या डॉक्टरनेच आत्महत्या केल्याने वैद्यकीय वर्तुळात एक खळबळ उडाल्याचे बघायला मिळतंय. डॉ. प्रशांत जावरकर यांनी त्यांच्या स्वत: च्या राहत्याघरी आत्महत्या केली. त्यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. ही घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला आहे. डॉक्टरांनी अशाप्रकारे आत्महत्या केल्याने रूग्णांना देखील धक्काच बसला.

सोलापूरमधील डॉ शिरीष वळसंगकर यांनी देखील काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असतानाच आता अकोल्यातील डॉक्टरने आत्महत्या केली. डॉ.वळसंगकर आत्महत्या प्रकरणात पोलीस तपास करत आहेत. मनीषा मुसळे या प्रकरणात कोठडीत आहे.या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी 42 साक्षीदार तपासण्यात आले आहेत. वळसंगकर यांच्या एसपी न्युरोसायन्स हॉस्पिटलमध्ये आरोपी मनीषा मुसळे माने हिने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. आता डॉ. प्रशांत जावरकर प्रकरणात काय खुलासे होतात, याकडे सर्वांच्या नजरा आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!