Tuesday, July 1, 2025
HomeUncategorizedहलक्यात घेऊ नका ! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून

हलक्यात घेऊ नका ! एकाच कुटुंबातील ९ जण डोळ्यादेखत गेले वाहून

अकोला दिव्य न्यूज : On Camera flash flood sweeps Away 9 family members in Pak video goes viral : पिकनीकसाठी गेलेल्या एका पाकिस्तानी कुटुंबावर काळाने घाला घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा भागात स्वात नदीत अचानक आलेल्या पूरामध्ये वाहून गेल्याने एकाच कुटुंबातील १८ पैकी ९ जणांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेचा हृदय हेलावून टाकणारा व्हिडीओ समोर आला असून तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे

न्यूज१८ ने रॉयटर्सच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, हे सर्व जण ‘पिकनीक ब्रेकफास्ट’साठी गेले होते आणि पाण्यात उभे राहून फोटो काढत होते. पण यावेळी अचानक पूर आला, असे जिल्हा अधिकारी शेहजाब महबूब यांनी सांगितले. ते काही सेल्फी घेण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी तेवढे पाणी नव्हते. अचानक पूराचे पाणी आले आणि लहान मुले वाहून गेली. पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता, जणू एखादा बांध फुटला आहे असे वाटत होते,असे या कुटुंबाच्या नातेवाईकाने रॉयटर्स टीव्हीशी बोलताना सांगितले.

दरम्यान सोशल मीडियावर शेअर होत असलेल्या या व्हिडीओमध्ये लोकांचा एक गट दगडावर अडकलेला पाहायला मिळत आहे. हे अडकलेले सर्वजण वाढत चाललेल्या पाण्याच्या प्रवाहात तग देऊन उभं राहण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओची अद्याप खात्री होऊ शकलेली नाही.

दोन तास मदतीसाठी ओरडत होते
दरम्यान परिसरातील रहिवाशांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितले की, बचाव पथके मदतीसाठी पोहचण्याच्या आधी पीडितांना दोन तासांपेक्षा जास्त वेळ वाट पहावी लागली. “ते मदतीसाठी दोन तास ओरडत आणि रडत होते,असे स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शींपैकी एक शिराज खान यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!