Tuesday, July 1, 2025
HomeUncategorizedविद्यार्थ्यांनी स्वतःसह कुटुंबाच्या उन्नतीसाठी कठीण परिश्रमच यशाची गुरुकिल्ली - ना.जयकुमार गोरे

विद्यार्थ्यांनी स्वतःसह कुटुंबाच्या उन्नतीसाठी कठीण परिश्रमच यशाची गुरुकिल्ली – ना.जयकुमार गोरे

अकोला दिव्य न्यूज : स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वतःसह परिवाराच्या उन्नतीसाठी कठीण परिश्रम घेऊन ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी, हिच यशाची गुरुकिल्ली आहे, असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांनी केले. अकोला जिल्हा अखिल भारतीय माळी महासंघातर्फे आयोजीत माळी समाज गुणवत्ता प्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळा व पालक मेळाव्याचे उद्‌घाटक म्हणून बोलत होते.

अखिल भारतीय माळी महासंघ अकोला जिल्ह्यातर्फे आयोजीत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी कौतुक सोहळ्याचं यंदा २० वे वर्ष होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ समाजभूषण शंकरराव गि-हे होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. अनुप धोत्रे, आ. रणधीर सावरकर, सुभाष सातव, वनिता राऊत, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार बळीराम सिरस्कार, तज्ञ मार्गदर्शक प्रा. ललित काळपांडे, अ.भा. माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अँड. प्रकाश दाते, महानगर भाजप अध्यक्ष जयंत मसने, प्रा. दिपक बोचरे, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष महेश गणगणे, जिल्हा उपनिबंधक डॉ. प्रविण लोखंडे, समता परिषद जिल्हाध्यक्ष गजानन म्हैसने, सुमित्रा निखाडे, प्रा. मिलिंद झाडे, प्रदेश संघटक गणेशराव काळपांडे, श्रीकृष्ण बिरकड, प्रकाश बिरकड, चंद्रशेखर चिंचोळकर, संजय अढाऊ, रेणुका सिरसकार, विजया उमप, श्यामशील भोपळे विचारपीठावर उपस्थीत होते.

संत सावता महाराज, महात्मा जोतीराव फुले, सावित्रीआई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. या सोहळ्यात दहावी, बाराबी, नीट, सिईटी व इतर क्षेत्रातील एकूण २१७ विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांचे हस्ते स्मृती चिन्ह, प्रमाणपत्र देऊन करण्यात आला.

अखिल भारतीय महासंघातर्फे जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. नितीन देऊळकार, सचिव मनोहर उगले, कोषाध्यक्ष प्रा.अशोक रहाटे, संजय तडस, सुनिल जाधव, सुनिल उंबरकर, जेष्ठ मार्गदर्शक रामदास खंडारे, श्यामभाऊ गोटफोडे, प्रा.अशोक भुराड, वसंत ढोकणे, प्रभाकर बोळे, गणेश म्हैसने, प्रकाश राऊत, सुनिल वावगे, विजय बोचरे, प्रा. प्रकाश वानखडे, ओमप्रकाश वेरुळकार, ज्ञानेश्वर बोदडे, केशवराव नागापूर, प्रा. रमेश भड, रामेश्वर तायडे, मनोहर गि-हे, अनिल हिंडोकार, पंकज जावरकर, सुभाष भड, हरिदास भोपळे, संजय पेटकर, धनंजय सिरस्कार तसेच समन्वयक बाळासाहेब ठाकरे, समन्वयिका कल्पना भराड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक प्रयत्न केले.

कार्यक्रमाचे संचालन प्रा. अशोक रहाटे, भाग्यश्री जावरकर, मनोहर उगले, माधुरी दाते यांनी तर आभार प्रदर्शन प्रणिता समरीतकर यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!