अकोला दिव्य न्यूज : केंद्र सरकारद्वारे जातीगत जनगणना करण्याची घोषणा केल्यानेसमाजात रोटी-बेटी व्यवहार करणाऱ्या समाजाची जातीनिहाय होणाऱ्या जनगणनासाठी जनजागरण अभियान आणि तेलंगी जात ही NT-C Category या वर्गात येत असल्याचे सत्यापन प्रमाणपत्र मिळविण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शन सभेचे आयोजन वाशिम शहरातील जिल्हा पत्रकार भवन मध्ये करण्यात आले होते.

अखिल भारतीय तेलुगु महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष हरीशअण्णा मिरजामले यांनी सभेत मार्गदर्शन करतांना सांगितले की, भारतात ज्या-ज्या भागात रोटी-बेटी संबंध करणारे लोक राहतात, त्या त्या भागात जातीगत जनगणना अधिका-यांना तेलुगू समाज बांधवांनी विस्तृत माहिती द्यावी. जनगणनेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कशाप्रकारे द्यावे, याबाबत मार्गदर्शन केले. जनगणना करणारी शासकीय यंत्रणा जेव्हा समाज बांधवांकडून जाती संबंधित माहिती घेण्यासाठी आल्यावर समाजबांधवांनी अशीच माहिती द्यावी की ज्यामुळे तेलुगू जात आरक्षणास पात्र असल्याची बाब पुराव्यानिशी सिद्ध करु शकतो. यासाठीच कार्यकर्त्यांना घरोघरी जाऊन मार्गदर्शन करावे लागेल.असे आवाहन मिरजामले यांनी केले.

सभेचे अध्यक्षस्थान हरीष अण्णा मिरजामले यांनी विभुषीत केले. यावेळी प्रमुख उपस्थिती चंद्रभूषण मुंगे बुलडाणा, महासंघाचे उपाध्यक्ष मधुकर मुत्यालकर खामगाव, महासचिव शशिकांत मैनुर बडनेरा, कोषाध्यक्ष अनील कोलपेकर शेगाव, सचिव मनोज गणकर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि सभेचे आयोजक सतीष बिर्ले, वाशिम यांची होते.

सभेत महासंघाचे कोषाध्यक्ष रत्नाकर गुण्डल शेगाव, अकोला येथून गणेश भंडारी, नंदकिशोर सावलेकर, सुभाष मूर्ति, रविप्रकाश संगेकर, महासंघाचे सहसचिव अंजूबाई सावलेकर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मोहिनीबाई माण्डलेकर, अमरावती येथून मोहन बोडे, महासंघाचे सहसचिव जितेंद्र गायकवाड, बुलडाणा येथून व्यंकटेशस्वामी अय्यर,चंद्रकांत चिट्वार,सुरेश ग्यारल, महासंघाचे सहसचिव मुकेश रेड्डी, भुसावळ येथील राजगोपाल तेलंग संतोष तेलंग, जळगांववरून महेश तेलंग खामगांव येथील राजेश सोनले, गणेश कोमुकर, गणेश अलवाल, छत्रपति संभाजी नगर येथून विनोद संकेत, संतोष गवल, भोपाळ येथील प्रणेश मूर्ति, प्रशांत कट्टुकर, इंदौरचे महासंघाचे सहसचिव सुरेश डाकोरकर. पूर्णा येथील रमेश बरकुण्ठे, नागेश्वर मित्रे, हिंगोलीवरून ओमप्रकाश श्रीलेले, पुसदचे रमेश म्यात्रे आणि विविध शहरातील महासंघाचे पदाधिकारी व राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य आणि मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
सभेला मोहन बोडे, व्यंकटेशस्वामी अय्यर, सतीश बिर्ले, चन्द्रकांत चिट्वार यांनी संबोधित केले, प्रस्ताविक शशिकांत अन्नाजी मैनुर तर संचालन मनोज गणकर आणि आभार प्रदर्शन विक्की कलकोट यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाशिम शहरातील माधव ग्यारल, चंद्रकात शिरपूरकर, सुनिल शिरपूरकर, सुमित शिरपूरकर, सचिन संगेप, राजेश गड्डम, तुपेश गोळे आणि तेलंगी समाजबांधवांनी सहकार्य केले.