अकोला दिव्य न्यूज : लेखापाल अंतिम वर्षाच्या परिक्षाचा निकाल आज रविवार ६ जुलैला द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्ट्स ऑफ इंडियाने (आयसीएआय) आज रविवार ६ जुलैला जाहीर केलेल्या CA Final अर्थात सनदी लेखापाल अंतिम वर्षाच्या परिक्षाचा निकालात रिषभ वसंत लढ्ढा यांनी दोन्ही ग्रुप एकाच वेळी उत्तीर्ण करीत नेत्रदीपक कामगिरी केली आहे.

सनदी लेखापाल अभ्यासक्रम अत्यंत कठीण समजला जातो. मात्र रिषभ लढ्ढाने दोन्ही ग्रुपची परिक्षा एकत्रित देऊन एकाच झटक्यात दोन्ही ग्रुप मध्ये उत्तीर्ण होण्याचा मान पटकावला. ग्रुप 1 मधिल तीन विषयांत एकुण 176 तर ग्रुप 2 मधील तीन विषयांमध्ये एकुण 131 या प्रमाणे एकत्रित 307 गुण प्राप्त केले.

माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि जुन्या काळातील प्रतिथयश खाजगी लेखापाल (अकाऊंडन्ट) स्व. राधेश्याम लढ्ढा यांचा रिषभ हा नातू असून, आजोबांकडून अकाऊंडन्टचा गुण रक्तातच मिळाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. राजस्थान राज्यातील प्रसिद्ध गुरुजी ठंडाई आणि श्री ४२० पापड व लोणचे आणि इतर मिष्ठान्नाचे अकोला शहरातील विक्रेता व कपिल एजन्सीचे संचालक वसंत लढ्ढा यांचा रिषभ जेष्ठ पुत्र आहे.

सीएचा अभ्यासक्रम कठीण समजला जाणारा असला तरी यासाठी निश्चित वेळेत नियमितपणे अभ्यास व सराव आवश्यक आहे. हे लक्षात घेऊन आपण यांचे काटेकोर पालन केले.यासोबतच आई-वडिलांचे सदैव सकारात्मक प्रोत्साहन, यामुळे हे यश प्राप्त केले आहे. असे रिषभने सांगितले. त्यांच्या या कामगिरीचे मूल्यमापन शब्दात व्यक्त करता येत नाही.पण त्याच्या आजोबांचे स्वप्न आज साकार झाले आहे. या यशाबद्दल त्याचावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
