अकोला दिव्य न्यूज : बीसीसीआय पंच परीक्षेत अकोल्याच्या पवन हलवणे यांनी देशात पहिला क्रमांक पटकावून प्रतिकूल परिस्थितीत, शेतकरी कुटुंबातून आलेल्या पवनने हे यश मिळवले. आपल्या कुटुंबाचं नव्हे तर गावाला जिल्ह्याला आणि देशालाही गौरव मिळवून दिल.

पवन श्रीकृष्ण हलवणे हे एका लहान शेतकरी कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील श्रीकृष्ण हलवणे आणि आई मीरा हलवणे आहेत. त्यांना शिवाली आणि प्राची नावाच्या दोन मुली आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे अनेकदा अडचणी येतात. तरीही पवनने जिद्दीने अभ्यास करत हे यश मिळवले. त्यांच्या पत्नी सपना यांनीही त्यांना साथ दिली.अहमदाबाद येथे बीसीसीआयची पॅनल पंच परीक्षा झाली. यात विदर्भातील अकोला जिल्ह्यातील सांगवी खुर्द गावचे पवन हलवणे अव्वल ठरले. त्यांच्यासोबतच विदर्भाचे विक्रांत देशपांडे यांनीही ही परीक्षा पास केली. या परीक्षेत 150 उमेदवारांमधून फक्त 26 जण निवडले गेले. पवनला 150 पैकी 147.5 गुण मिळाले. तर देशपांडे यांना 130 गुण मिळाले.
पवन आता राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात अम्पायर (पंच) ही महत्वाची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे पवनचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. अकोला जिल्ह्यासाठी ही अतिशय अभिमानाची बाब आहे. महिला पुरुष उमेदवारांमध्ये सोनिया राजुरिया व नामा खोब्रागडे यांनी सामना पंच परीक्षा उत्तीर्ण केली.
पवनने लहानपणापासूनच खूप मेहनत घेतली. त्याचे फळ त्याला आता मिळाले आहे. या यशाबद्दल बोलताना त्यांचे कुटुंबीय म्हणाले, “शेतकरी असूनही आम्ही पवनला नेहमीच साथ दिली. सुरुवातीला त्याला विरोध केला, मात्र त्याची मेहनत पाहून आम्हीही त्याला साथ दिली.” अकोला जिल्हा हा शेतकऱ्यांच्या आत्महत्यासाठी ओळखला जातो. अशा परिस्थितीत पवनने मिळवलेले यश खूप महत्त्वाचे आहे. पवन आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंच म्हणून काम करेल. हे अकोला जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे. पवनने वीस वर्षे मेहनत करून हे यश मिळवले आहे. पवनकडे पाहून आता इतरांनाही प्रेरणा मिळणार आहे.