अकोला दिव्य न्यूज : अकोल्याचे माजी महापौर मदन भरगड यांची राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशच्या उपाध्यक्षपदी नियुक्ति करण्यात आली आहे. मुंबई येथील राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते मदन भरगड यांना प्रदेश उपाध्यक्षपदाचे नियुक्ती पत्र देण्यात आले.यावेळी आमदार अमोल मिटकरी जिल्हाध्यक्ष बदरुजमा, काशीराम साबले, प्रतिभा अवचार, अमोल कालणे, संध्या वाघोडे, उज्वला राऊत, अभिषेक भरगड, किशोर तेलगोटे उपस्थित होते. मदन भरगड यांच्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेशासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार १२ जूनला अकोला आले होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मदन भरगड यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश केला होता.

मदन भरगड यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला निश्चित फायदा होईल असे आपल्या भाषणात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी म्हटले होते.अकोला महापालिका नगर सेवक, महापौर, विरोधीपक्षनेता, स्थायी समिती सदस्य, बांधकाम सभापती अशा विविध पदावर राहून मदन भरगड यांनी कार्य केले आहे.आपल्या महापौरपदाच्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात 400 कोटींची व नगरसेवकाच्या पदावर राहून अनेक विकास कामे केली आहे. त्या मधे १३२ कोटीची भूमिगत गटार योजना,१३२कोटीचे एकात्मिक रास्ता विकास प्रकल्प योजना, गणगौरघाट व गणेशघाटचे निर्माण, स्मशानभूमी व कब्रस्थानचे सौंदर्यीकरण, घरकुल व दलितवस्ती सुधार योजनांतर्गत कोट्यावधी रूपयांचे विकास कार्य केले होते.
हार्ट सर्जरी, ब्रेन ट्यूमर, कॅंसर, किडनी फेल्युअर, एड्स सारखी मोठ्या आजारासाठी शहराच्या जनतेला आर्थिक मदत करण्याचे निर्णय केले होते. शहरातील गणेश भक्तांना प्रोत्साहित करण्यासाठी श्रीभक्त सन्मान योजना सुरु केली होती. बीजिंग ओलंपिक स्पर्धेकरिता भारताचे बॉक्सरची निवड व्हावी या करिता महापौर सुपर कप बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन केले होते.

यावेळी आमदार अमोल मिटकारी जिल्हाध्यक्ष बदरुजमा, काशीराम साबले, प्रतिभा अवचार,अमोल कालणे, संध्या वाघोडे, उज्वला राऊत, अभिषेक भरगड, किशोर तेलगोटे उपस्थित होते.