अकोला दिव्य न्यूज : अकोला शहर व परिसरात सर्वत्र ‘व्हायरल इन्फेक्शन’ने डोके वर काढले असून सर्दी, ताप, घशात खवखव व खोकल्याच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. यामध्ये लहान बालकांची संख्या वाढत चालली आहे. हवामानातील बदल, सतत सुरू असलेला पाऊस आणि प्रदूषण यामुळे संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. अख्या शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग पसरलेले असून ते वेळेत उचलले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.जंतुनाशकाची फवारणी देखील बंद झाली आहे.मात्र महानगर पालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग झोपी गेला आहे.

सर्वोपोचार रुग्णालयासह प्रत्येक दवाखान्यात ३० ते ४० टक्के रुग्ण याच लक्षणाचे येत आहेत. व्हायरल इन्फेक्शनची सुरुवात सर्दी, शिंका, ताप आणि घशातील खवखव या लक्षणांपासून होते. मात्र योग्य उपचार न केल्यास किंवा वेळेत डॉक्टरांचा सल्ला न घेतल्यास पुढे जाऊन गुंतागुंत निर्माण होऊन ब्रॉन्कायटिस, न्यूमोनिया, अथवा घशात जळजळ व सूज अशा गंभीर आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागते.
सध्या वातावरणातील बदल आणि आर्द्रता यामुळे व्हायरल इन्फेक्शनचे प्रमाण वाढत आहे. सर्दी-तापाला सामान्य समजून दुर्लक्ष करू नका. विशेषतः खोकला सातत्याने होत असेल, तर तो फुफ्फुसांवर परिणाम करणारा असू शकतो. सध्या शासकीय रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात अशा लक्षणांचे रुग्ण अधिक प्रमाणात दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाला ओपीडीमध्ये १०० च्यावर रुग्ण सर्दी, खोकला ताप या लक्षणांची येत आहेत. आपल्याकडे बाजारात ट्रेन, बसमध्ये मोठी प्रमाणात गर्दी असते. या अशावेळी हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्वसाधारण नियम पाळले पाहिजे. या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार आणि शरीर डीहायड्रेट होणार नाही याची काळजी घेऊन पाणी मुबलक प्रमाणात प्यावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
सावधगिरी हाच उपाय
गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, मास्क वापरा, हात स्वच्छ धुवा, आणि पुरेशी झोप व पोषक आहार घ्या, असे आरोग्य विभागाने सांगितले आहे. या आजराची लक्षणे दिसताच विशेष करून ज्यांना सहव्याधी आहेत त्यांनी घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. श्राफ यांनी सांगितले.
.
गेल्या काही दिवसांपासून व्हायरल संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दिवसाला ओपीडीमध्ये १०० च्यावर रुग्ण सर्दी, खोकला ताप या लक्षणांची येत आहेत. आपल्याकडे बाजारात ट्रेन, बसमध्ये मोठी प्रमाणात गर्दी असते. या अशावेळी हा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरतो. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेचे सर्वसाधारण नियम पाळले पाहिजे. या आजारात रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे प्रोटीनयुक्त आहार आणि शरीर डीहायड्रेट होणार नाही याची काळजी घेऊन पाणी मुबलक प्रमाणात प्यावे,असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.