अकोला दिव्य न्यूज : सातत्याने वादग्रस्त विधाने करून नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी चक्क आमदार निवासात असलेल्या कॅन्टीनमधील जेवणावरून कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. आ.गायकवाड हे मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या घटनेनंतर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

नेमकं काय आहे प्रकरण?
संजय गायकवाड हे आता आमदार निवासमध्ये वास्तव्यास आहेत. रात्रीचे जेवण कन्टीनला करत होते. त्यावेळी त्यांना देण्यात आलेली डाळ ही निकृष्ठ दर्जाची असल्याने संतापले.ते काऊन्टरजवळ गेले आणि कॅन्टीन व्यवस्थापकाला त्यांनी बोलावलं. त्यावेळी त्याला गायकवाडांनी खराब डाळीचा वास घ्यायला लावला. तेव्हा त्यानेही डाळ खराब असल्याचं मान्य केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर मात्र गायकवाडांचा पारा चांगलाच चढला.
संजय गायकवाडांनी त्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्यावेळी आजू-बाजूच्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. पण ते काही थांबले नाहीत. त्यासोबतच फूड डिपार्टमेंटकडे ती डाळ पाठवायला सांगितली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असलेला पाहायला मिळत आहे. आपण आमदार असून ते अशा प्रकारची डाळ देत असतील तर सर्वसामान्यांना कशा प्रकारे देत असतील असं गायकवाड म्हणाले.
सतत वादग्रस्त विधाने करतात
आमदार संजय गायकवाड सतत वादग्रस्त विधाने करतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल ते बोलले होते. छत्रपती संभाजी महाराज १६ भाषा शिकले, मग ते मूर्ख होते का? छत्रपती शिवाजी महाराज बहुभाषिक होते, ते मूर्ख होते का? असे गायकवाड म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी या वक्तव्याबद्दल माफीही मागितली. त्या प्रकरणावर पडदा पडत नाही, तोच गायकवाडांनी नवी वादाला निमंत्रण दिले.