अकोला दिव्य न्यूज : Chhatrapati Sambhajinagar Crime News : समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर काल उशीरा रात्री दोन कर्मचाऱ्यांच्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळीबार होऊन थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात गोळी घुसली. गोळीबारात भरत घाटगे हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोळीबारानंतर दुसरा कर्मचारी फरार झाला. दोघांमध्ये वाद का झाला आणि त्यातून गोळीबार का करण्यात आला हे अजून स्पष्ट झालं नाही.

छत्रपती संभाजीनगरच्याफुलंब्री तालुक्यातील सावंगी येथील समृद्धी महामार्गाच्या टोलनाक्यावर मंगळवारी रात्री एक गंभीर घटना घडली. दोन कर्मचाऱ्यांमध्ये वादाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या झटापटीत अचानक पिस्तूलमधून गोळी सुटली, आणि ती थेट एका कर्मचाऱ्याच्या पोटात घुसली. या गोळीबारात भरत घाटगे हे कर्मचारी गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ही घटना काल शुक्रवार, तारीख 11 जुलै रोजी उशिरा रात्री समृद्धी महामार्गावरील सावंगी टोलनाक्यावर घडली. माहितीनुसार, भरत घाटगे आणि दुसरा कर्मचारी यांच्यात काही कारणावरून वाद झाला. वाद इतका टोकाला गेला की त्यामध्ये हाणामारीची वेळ आली. त्या झटापटीदरम्यान दुसऱ्या कर्मचाऱ्याकडे असलेले पिस्तूल अचानक भरत घाटगे यांच्या दिशेने सुटलं, आणि गोळी थेट त्यांच्या पोटात घुसली. घटनेनंतर पिस्तूलधारी कर्मचारी घटनास्थळावरून पलायन करण्यात यशस्वी झाला. यामुळे पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. याप्रकरणी पोलिसांनी ‘समृद्धी’च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पिस्तूल कर्मचाऱ्यांकडे कुठून आले, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.
नाक्यावर पिस्तूल आले कुठून?
याप्रकरणी पोलिसांनी ‘समृद्धी’च्या अधिकाऱ्याकडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कर्मचाऱ्यांना पिस्तूल देण्यात आले नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे हे पिस्तूल दोन कर्मचाऱ्यांकडे कुठून आले, यासंदर्भात चौकशी सुरू आहे.