अकोला दिव्य न्यूज : रोटरी क्लब ऑफ अकोला नॉर्थ अकोला आणि जिल्हा पेन्शनर्स असोसिएशन तसेच श्रीराम हॉस्पिटल आणि स्माईल ट्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक सर्जरी दिनानिमित्त मोफत तपासणी व प्लास्टिक सर्जरी शिबिर डॉ.एन.आर सलामपुरिया मेमोरियल श्रीराम हॉस्पिटल येथे उत्साहात पार पडले. शिबिरामध्ये जन्मापासून असलेले लिंग दोष हायपो पीडियास, चिकटलेली जीभ, जन्मापासून चिकटलेल्या व जास्तीच्या बोटांची शस्त्रक्रिया डायबेटीक फूट केअर, बेड सोवर, मोठ्या जखमांवर त्वचारोपण, कॉस्मेटिक सर्जरी तसेच त्वचारोग केसांच्या आणि नखांच्या समस्या विशेष म्हणजे जळाल्यानंतर आलेल्या विकृतींच्या रुग्णांची मोफत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

प्लास्टिक सर्जरीची आवश्यकता असलेल्या रुग्णांची निवड करण्यात येऊन नाममात्र दरात आणि काहींची मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात येणार आहे. याकरिता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ मयूर बी अग्रवाल आणि त्वचारोग कुष्ठरोग व सौंदर्यशास्त्र तज्ञ डॉ सौ.श्रद्धा.एम अग्रवाल यांनी तपासणी करून मार्गदर्शन केले.
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ स्त्री रोग तज्ञ डॉ शारदा सलामपुरिया यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वप्रथम प्रथम शल्यचिकित्सक महर्षी सुश्रुत यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून आणि दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन केले. त्यांनी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा दिल्या तसेच अशा प्रकारचे शिबिराचे आयोजन करण्याबद्दल आयोजकांचे कौतुक केले. याप्रसंगी अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती, उपाध्यक्ष रामभाऊ बिरकड,सचिव एकनाथराव उके यांनी डॉ मयूर अग्रवाल आणि डॉ श्रद्धा अग्रवाल यांचे शाल पुष्पगुच्छ आणि पुस्तक देऊन सत्कार केला.
या शिबिरात एकूण 150 रुग्णांची तपासणी करून 38 रुग्णांची प्लास्टिक सर्जरी करिता निवड करण्यात आली. इतरांना मार्गदर्शन करून औषधी वितरित करण्यात आली कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ अकोलाचे अध्यक्ष डॉ श्रद्धा अग्रवाल, उपाध्यक्ष अखिलेश पारीका सचिव प्रा महेश बाहेती, स्नेहल जोशी, कोषाध्यक्ष डॉ गजानन वाघोडे, अकोला इन्क्लेव्ह प्रेम किशोर चांडक, सहाय्यक प्रांतपाल सुनील घोडके,सर्जिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रणजीत सपकाळ, डॉ महेंद्र चांडक डॉ संदीप इंगळे, विदर्भ सर्जिकल सोसायटीचे डॉ रवींद्र तेलकर, तसेच दीपक चांडक, डॉ जुगल चिराणिया, डॉ सुरेश तारे, मुरलीधर कौशल, मंजुषा कौशल, विजय कौशल, विजयनंद मुळतकर, अँड.रवी शर्मा, देवेंद्र देशमुख, संजय गोडा, राजेश खंडेलवाल, प्रवीण ढोणे, डॉ हुजैफा हजर होते
कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रदर्शन रोटरी क्लब अकोलाचे सचिव प्रा महेश बाहेती यांनी केले