अकोला दिव्य न्यूज : माहिती तंत्रज्ञानाच्या झपाट्याने बदलत जाणाऱ्या जगात आता अकोला शहर देखील आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत आहे. ‘मारवाडी बिझनेस नेटवर्किंग फाउंडेशन ऑफ इंडिया’ (MBF) च्या अकोला शाखेच्या वतीने शहरात प्रथमच ‘एआय’वर आधारित विशेष कार्यशाळेचे (सेमिनार) आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील हॉटेल वेलकम इन येथे येत्या बुधवार २३ जुलै २०२५ रोजी आयोजित या कार्यशाळेची सुरुवात सायंकाळी ७:३० वाजता स्वरुची भोजनाने होईल, यानंतर सेमिनारचे औपचारिक उद्घाटन रात्री ८:३० वाजता होणार आहे. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अदिती आशीष बाहेती करणार आहेत. त्या एक अनुभवी AI स्पेशलिस्ट आणि टेक्नोलॉजी एक्सपर्ट असून या विषयातील गुंतागुंतीच्या गोष्टी सहज आणि सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगणार आहेत.
या सेमिनारमध्ये AI अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा व्यावसायिक उपयोग, ऑटोमेशन व उत्पादनक्षमता वाढ, स्मार्ट मार्केटिंग टूल्स, डेटा-आधारित निर्णयक्षमतेचा वापर, व्यवसायातील स्पर्धात्मकता आणि भविष्यातील ट्रेंड्स याविषयी सखोल माहिती दिली जाणार आहे.
ही कार्यशाळा खास करून उद्योजक, व्यावसायिक, टेक्नॉलॉजी प्रेमी आणि नवउद्योजकांसाठी उपयुक्त ठरणार आहे. आसन व्यवस्था मर्यादित असल्याने लवकरात लवकर नोंदणी करण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. सेमिनार बाबतीत अधिक माहिती व नोंदणीसाठी 88885 50066 | 88889 97722 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.