अकोला दिव्य न्यूज : अकोला कंज्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रीब्यूटर असोसिएशनची वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्याची एक दिवसीय ‘झोन मीट’ अकोला येथे हर्षोल्लासात संपन्न झाली. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष धैर्यशील पाटील, सचिव प्रफुल्ल जैन, कोषाध्यक्ष विजय नारायण पुरे, प्रशांत शिंदे संघटन सचिव श्याम शर्मा, सहसचिव पुनित कुसुमागर,विदर्भ प्रांताचे अध्यक्ष सुमेध कोटपल्लीवार आणि विविध झोनचे अध्यक्ष तसेच तिन्ही जिल्ह्याचे अध्यक्ष सहभागी होते. विशेष अतिथी म्हणून कालूराम फूड प्रॉडक्ट्सचे संचालक शिवप्रसाद रूहाटिया व सिद्धार्थ रूहाटिया यांची उपस्थिती होती.

प्रमुख पाहुणे आणि तिन्ही जिल्ह्यातील वितरकांच्या आगमन प्रसंगी तुतारी वाजवून तसेच कुंकुम टिळा लावून अत्तर व पुष्प देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अकोला सीपीडीएचे अध्यक्ष श्यामलाल अग्रवाल यांनी केले व्यक्त केले. त्यानंतर अकोला वाशिम बुलढाणा झोनचे अध्यक्ष प्रदीप बियाणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
विशेष अतिथी शिवप्रसाद रूहाटिया यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, एजन्सी व्यवसायात वितरकांनी कोणत्या कंपन्या घ्याव्या व कशा पद्धतीने चालवाव्या, त्यामध्ये आपला आत्सन्मान कायम ठेवून व्यवसाय करावा, असे सांगून अनेक मौलिक बाबी नमूद केल्या. त्यानंतर सिद्धार्थ रूहाटिया यांनी कालूराम प्रॉडक्ट्स बाबत माहिती दिली.
संस्थेचे सचिव प्रफुल जैन यांनी असोसिएशनच्या कार्याबद्दल सविस्तर माहिती देऊन कंपन्यासोबत असलेल्या काही विवादास्पद मुद्द्यावर सविस्तर माहिती दिली. फेडरेशनचे राष्ट्रीय तथा महाराष्ट्राचे अध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी फेडरेशनच्या वतीने सरकारसोबत विविध अडीअडचणीवर काय व कशी चर्चा होते, हे सविस्तर समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन रमेश कदम यांनी अतिशय सुंदररित्या केले. दुपारी खुल्या चर्चेत तिन्ही जिल्ह्यातील वितरकांना कंपनीसोबत असलेल्या अडीअडचणीवर श्याम शर्मा व प्रफुल जैन यांच्यासोबत चर्चा झाली. शेवटी राजेंद्र पातुरकर यांनी आभार प्रदर्शन केले. एकंदरीत सर्व कार्यक्रम अतिशय बहारदार झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अकोला सीपीडीऐच्या सर्व सदस्यांचा सिंहाचा वाटा होता. शेवटी लकी कुपनचा ड्रा काढून भाग्यवंताला भेटवस्तू देऊन एक दिवसीय अधिवेशनाचा समारोप करण्यात आला.