अकोला दिव्य न्यूज : Donald Trump : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला टॅरिफमधून आणखी ९० दिवसांची सूट दिली आहे. व्हाईट हाऊसच्या अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. काही तासांपूर्वी या संदर्भातल्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सही केली आहे असं या अधिकाऱ्याने सांगितलं आहे. या निर्णयामुळे चीनला टॅरिफसाठी आणखी ९० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनने जे सहकार्य दिलं त्याचं कौतुक केलं. ते म्हणाले, आम्ही पुढे काय होतं ते बघू. जिनपिंग आणि आमचे चांगले संबंध आहेत. आम्ही आता पुढील ९० दिवसांसाठी चीनसाठी टॅरिफमधून स्थगिती दिली आहे.

१० नोव्हेंबरपर्यंत चीनला मिळाला दिलासा
चीन इंपोर्ट टॅरिफसाठी आधी १२ ऑगस्टची रात्री १२ वाजेपर्यंतची मुदत होती. जर ९० दिवसांची मुदत मिळाली नसती तर चिनी वस्तुंवरचं आयात शुल्क ३० टक्के वाढलं असतं. याला उत्तर म्हणून चीननेही निर्यात शुल्क वाढवलं असतं. आता चीन आणि अमेरिका या दोन्ही देशांनी टॅरिफची मुदत ९० दिवसांनी वाढवली आहे. ही मुदत आता १० नोव्हेंबर २०२५ ला रात्री १२ वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. त्यामुळे चीनला टॅरिफमधून दिलासा मिळाला आहे.
एप्रिल महिन्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरचं टॅरिफ १४५ टक्के वाढवलं होतं. ज्यानंतर चीननेही शुल्क १२५ टक्के वाढवलं. या नंतर दोन्ही देशांचे प्रतिनिधी जून महिन्यांत लंडनला भेटले होते. त्यानंतर दोन्ही देशांनी टॅरिफबाबत नरमाईचं धोरण अंगिकारलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यातच अनेक देशांवर टॅरिफ लावण्यास सुरुवात केली.
अमेरिका आणि चीनने परस्परांच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावला होता. ट्रिपल-डिजिट लेवलपर्यंत हा टॅरिफ पोहोचला होता. त्यामुळे दोन्ही देशांना परस्परासोबत व्यापार करताना बऱ्याच अडचणी आल्या. मे २०२५ मध्ये दोन्ही देशांनी अस्थायी काळासाठी टॅरिफ कमी करण्याचा निर्णय घेतला. मागची डेडलाइन १२ ऑगस्ट २०२५ ला सकाळी १२ वाजून ०१ मिनिटांनी संपणार होती. असं झालं असतं तर अमेरिकेत चिनी सामानाच्या आयातीवर आधीपासूनच असलेला टक्के टॅरिफ वाढला असता. प्रत्युत्तरात चीननेही अमेरिकेतून आयात होणाऱ्या सामनावर टॅरिफ वाढवला असता.