अकोला दिव्य न्यूज : प्रजासत्ताक भारताचा ७९ वा स्वातंत्र्यदिन सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गोदावरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रदिपसिंह राजपूत आणि प्राचार्या मनिषा राजपूत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. पाहुण्यांचे आगमन व स्वागत इयत्ता दहावी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी मार्च पास्टने केले.यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर समूहगीत ‘एक दौर नया दुनिया में सुरू बच्चों के कदम से होगा’ सादर केले. या गीताला तबल्याची साथ केली हर्ष इंगोले या विद्यार्थ्याने तर संवादिनीची साथ दिली शुभम नारे यांनी दिली. त्यामुळे विरसपूर्ण व देशभक्तीपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

काही विद्यार्थ्यांची भाषणे झाली.त्यामध्ये तन्वी पळसपगार, निधी जाधव, गौरी सोनटके, प्रियांशी वाडेकर, दर्शन आवटे आणि ईशांत राऊत हे विद्यार्थी सहभागी झाले होते.त्याचप्रमाणे गुंजन मंजुरकार, अर्णव चव्हाण,संध्या वाहुरवाघ आणि अविश क्षीरसागर यांनी देशभक्तीपर गीते सादर केली.या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर सादर केलेले नृत्य .यामध्ये गायत्री चारोडे, ऋतुजा वानखेडे, समृद्धी इंगोले, लक्षीता किल्लेदार, वेदश्री मानकर, शिवानी भालेराव या विद्यार्थिनी सहभागी झाल्या होत्या.
प्राचार्या मनिषा राजपूत यांनी स्वातंत्र्य मिळाले म्हणजे जबाबदारी संपली असे नाही.ते टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला देशसेवा, स्वच्छता व नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडावे लागेल. असे आपल्या भाषणातून सांगितले.ज्याप्रमाणे आपल्याला संविधानाने हक्क दिले आहेत त्याचप्रमाणे काही कर्तव्याचे निर्वहन करण्यास सांगितले आहे.ते आपण विसरून चालणार नाही.

यावेळी राजपूत यांनी स्वातंत्र्या बरोबर आपल्या जबाबदाऱ्याही वाढल्या आहेत.त्या व्यवस्थित पार पाडणे म्हणजेच खरी देशभक्ती ठरेल.देशभक्ती व कर्तव्यने प्रेरित एकात्मिक समाज आपल्याला निर्माण करावयाचा आहे.आणि तो या विद्यार्थ्यांमध्ये सुप्त रूपाने वसतो आहे असे प्रतिपादन केले.ज्याप्रमाणे सैनिक सीमेवर आपले संरक्षण करतात. त्याचप्रमाणे असैनिक म्हणजे नागरिक म्हणून भविष्यासाठी सुजाण व संस्कारित पिढी निर्माण आपले कर्तव्य आहे. असे पालकांना उद्देशून सांगितले. त्याची सुरुवात आपल्या पासूनच करावी लागेल.आज देशाला बलिदानाची नाही तर सेवेची आणि संस्कारशील पिढीची गरज आहे असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्र संचालन खानझोडे सरांनी आणि अंजली चराटे व दर्शना बेलसरे या विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी परिश्रम केले.कार्यक्रमाची सांगता मुलांना खाऊ वाटप करून झाली.