अकोला दिव्य न्यूज : दोन दिवसीय विदर्भस्तरीय स्वातंत्र्य करंडक एकांकिका स्पर्धेत नागपूर येथील साई श्रवण सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने सादर केलेल्या वि. प्र.(विद्यार्थी प्रतिनिधी) या नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून स्पर्धेचा करंडक व नाट्य तपस्वी जेष्ठ नाटककार स्व. राम जाधव स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा १५ हजार रुपयांचा रोख पुरस्कार पटकाविला आहे. नागपूरच्याच तांडव क्रिएशनने सादर केलेल्या ‘दृष्टांत’ नाटकाने द्वितीय क्रमांक मिळवून स्वातंत्र्य सेनानी स्व. मारुतीसा सावजी स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा १० हजार रुपयांचा पुरस्कार पटकाविला आहे. अमरावती येथील श्री. नटराज शैक्षणिक सांस्कृतिक व क्रीडा मंडळाच्या ‘लोककलेच्या बैलाले पो’या नाटकाने तृतीय क्रमांक पटकावून नट श्रेष्ठ निळू फुले आर्ट फाउंडेशन अकोलाचे ज्येष्ठ नाट्यकलावंत रमेश थोरात यांच्या वतीने देण्यात येणारा ५ हजार रुपयांचा पुरस्कार मिळविला आहे.सिद्धी गणेश प्रोडक्शन अकोलातर्फे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

ज्येष्ठ नाट्यकर्मी प्रा. मधु जाधव, लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडचे अकोला जिल्हाध्यक्ष प्रदीप खाडे, लोकजागर संघटनेचे शेतकरी नेते प्रशांत गावंडे, ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत सावजी, नाट्य दिग्दर्शक विष्णुपंत निंबाळकर यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. दोन दिवसात सादर करण्यात आलेल्या २१ नाटकांचे परीक्षण टीव्ही व सिने कलावंत अपूर्वा चौधरी तसेच चैतन्य सरदेशपांडे यांनी केले.
नाट्य महोत्सवाचे आयोजक सचिन गिरी यांनी प्रास्ताविक व आभार प्रदर्शन केले. स्व. शांताराम जामदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता व अभिनेत्री पुरस्कार ‘नवस’ या नाटिकेतील प्रणव कोरे व शुभांगी करुले यांना देण्यात आला. लेखक दिग्दर्शक स्व. दत्तात्रय उमाळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा उत्कृष्ट संहिता लिखाण पुरस्कार ‘वि. प्र.’ नाटकाबद्दल तन्मय गंधे यांना देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रथम पुरस्कार तन्मय गंधे. द्वितीय पुरस्कार अभिषेक बेलनारवार यांना तर तृतीय पुरस्कार तुषार काकड यांना देण्यात आला. पुरुषांमधून सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार तुषार काकड, रोहित घंगरकर सार्थक पांडे व सागर देशपांडे यांना देण्यात आला. स्त्रियांमधून सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रयोशनी ठाकूर, शरयू माने, व आकांक्षा भाके यांना देण्यात आला.
सर्वोत्कृष्ट नेपथ्याकरिता शिवम मस्के, स्तवन गवारे, उमेश देशपांडे यांना तर प्रकाश योजने करिता प्रणव कोरे, वेद वळिवकर, दीपक नांदगावकर यांना पुरस्कार देण्यात आला. पार्श्व संगीता करिता स्तवन गवारे, सुशांत पाटील, गौरव जोंधळे कर, यांना तर अभिनयासाठी उत्तेजनार्थ पुरस्कार पूर्वा वाकोडे, रेणुका पुराणिक, ऐश्वर्या शिंदे, वैष्णवी राऊत, योगेश जाधव यांना देण्यात आला.
सदर स्पर्धेच्या आयोजनाकरिता राजीव बियाणी, चंद्रकांत सावजी, डॉ. संतोष हुशे, रमाकांत खेतान, रमेश थोरात, शत्रुघ्न बिरकड, हरीश अलीमचंदानी, श्रीमती अनिता भालतिलक, पंकज देशमुख, गोविंद उमाळे, प्रशांत जामदार, अकोला अर्बन बँक यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे संचालन व निकाल वाचन उदय दाभाडे यांनी केले. महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाकरिता सचिन गिरी, महेश इंगळे, मंदार घेवारे, अक्षय पिंपळकर, अनिल कुलकर्णी, श्रीकांत गावंडे, गोविंद उमाळे आदींनी परिश्रम घेतले.