अकोला दिव्य न्यूज : हौशी व व्यावसायिक छायाचित्रकारांच्या प्रगतीसाठी कार्यरत असणाऱ्या अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असो.च्या वतीने या वर्षीही जागतिक छायाचित्र दिन अनेक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने मंगळवार दि १९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता स्थानीय राजेश्वर मंदिर पासून भव्य कॅमेरा दिंडीचे आयोजन करण्यात आले असून संपूर्ण छायाचित्रकारांच्या एकजुटीने प्रदर्शन घडविण्याऱ्या या दिंडीत छायाचित्रकार आपापल्या कॅमेरा व उपकरण समवेत या दिंडीत सहभागी होणार आहेत.

या दिंडीचे उद्घाटन जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांच्या हस्ते होणार आहे. ही दिंडी राजेश्वर मंदिर पासून प्रारंभ होऊन जयहिंद चौक,मोठा पूल, सिटी कोतवाली,गांधी चौक,मनपा चौक मार्गे स्वराज्य भवन परिसरात येऊन या ठिकाणी या दिंडीचा समारोप होणार आहे. छायाचित्रकारांचा आपसात सुसंवाद वाढावा,स्नेह वृद्धिंगत व्हावे यासाठी असो.च्या वतीने छायाचित्रकार सदस्यासाठी दि २३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वाडेगाव रस्त्यावरील अवनीश कृषी पर्यटन केंद्र येथे “जलजल्लोष” या
वार्षिक आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
छायाचित्रकारांच्या कुटुंबासाठी आयोजित या कार्यक्रमात महिलांसाठी संगीत खुर्ची, दहीहंडी,कॅमेरा पूजन,पारंपरिक वेशभूष स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम आणि वॉटर तसेच अडवेंचर एक्टिविटीची धम्माल राहणार आहे. व्यावसायिक व हौशी फोटोग्राफर हे केवळ फोटोपुरते मर्यादित नसून तर ते सिनेमा, लुघपट, डॉक्युमेंट्री व अन्य राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय घटनांशी प्रामाणिक पणे जुळलेले आहेत.फोटोग्राफी ही आवड, करियर, पॅशन, व्यावसायिक, हौशी दृष्टीकोन व समाज भान अशा विविध विषयांवर असून असो.सातत्याने संघटन समवेत सामाजिक दायित्व पण जोपासत असते.त्यात अंतिम श्रावण सोमवारी राजराजेश्वर पालखीचा स्वागत कार्यक्रम, गणेश विसर्जन मिरवणूक छायाचित्र स्पर्धा व प्रदर्शनी, काटेपूर्णा अभयारण्य फोटो वॉक स्पर्धा व सफारीचे आयोजन, कोजागिरी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रम, गरजूंना १०० ब्लॅकेट वितरण, जेष्ठ छायाचित्रकार यांची कार्यशाळा व प्रदर्शनी, महिला दिनी फोटोग्रॉफर महिलांचा सत्कार व सर्व फोटोग्राफर साठी विमा शिबिराचे आयोजन करून भविष्य सुरक्षित करण्यात आले.
तसेच व्याख्यान व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त फोटोग्राफर वर्गासाठी आरोग्य तपासणी शिबिर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.दि १९ ऑगस्ट रोजी आयोजित या कॅमेरा दिंडी मध्ये सर्व छायाचित्रकार व संलग्न असोच्या पदाधिकारी वर्गाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले. अकोला-बुलडाणा जिल्हा फोटोग्राफर्स असो,चे अध्यक्ष नरेंद्र नायसे, उपाध्यक्ष नीरज भांगे, दिग्विजय देशमुख,सचिव नितीन देशमुख, सहसचिव उमेश चाळसे, दत्तात्रय सरोदे, कोषाध्यक्ष योगेश उन्होने,सदस्य सुशील बडेरे ,शामसुंदर बाळे, महेश इंगळे,हर्षल गढेकर, राहुल ताडे, गणेश खेते, राज पिंपळे, प्रविण अंबिलकर, पंकज पराते आदी पदाधिकारी कार्यरत आहेत.
अशी माहिती प्रसिद्धि पत्रकाद्वारे नीरज भांगे यांनी कळविली आहे.