Saturday, August 30, 2025
HomeUncategorizedदिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘जयपूर फूट’ उपयुक्त-पोलीस अधिक्षक अर्चित चांडक

दिव्यांगांना आत्मनिर्भर करण्यासाठी ‘जयपूर फूट’ उपयुक्त-पोलीस अधिक्षक अर्चित चांडक

अकोला दिव्य न्यूज : दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर करण्यासाठी जयपूर फूट उपयुक्त असून, त्याचे गरजूंना विनामूल्य वितरण हे मोठे सेवाकार्य असल्याचे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधिक्षक अर्चित चांडक यांनी केले.

इंडियन रेडक्रॉस सोसायटी व लॉयन्स क्लब ऑफ पुणे सुप्रिम यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या जयंतीनिमित्त विनामूल्य जयपूर फूट वितरण महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी रामेश्वर मणियार, रजनी अंबादे, नितीन धोत्रे, संस्थेचे चेअरमन डॉ.किशोर मालोकार, प्रकाश गवळी, अविनाश बेलोकार, सचिव प्रभजितसिंह बछेर उपस्थित होते.

ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी शिबिराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. समाजहितासाठी सेवेची प्रक्रिया सातत्यपूर्ण असणे गरजेचे असते. त्यामुळे सर्वांनी सेवाकार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन चांडक यांनी केले. सूत्रसंचालन मनोज चांडक तर आभारप्रदर्शन ॲड. सुभाषसिंह ठाकूर यांनी केले.‌

याप्रसंगी संदीप पुंडकर, ॲड. सुभाष मुंगी, ॲड. महेंद्र साहू, प्रशांत राठी, संदेश चांडक, कपिल रावदेव, राजू बुडुकले, रामहरी डांगे, अमर गौड, डॉ. गजानन वाघोडे, पंकज राठी आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!