अकोला दिव्य न्यूज : विद्या भारती विदर्भ प्रांताच्या २०२५ ते २०२८ या कार्यकाळासाठी नवे कार्यकारिणी मंडळ जाहीर झाले असून अध्यक्षपदी अकोल्याचे सचिन केशव जोशी यांची निवड करण्यात आली आहे.

निवडणूक प्रक्रिया निर्वाचन अधिकारी सुधाकर रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या बैठकीत विद्या भारतीचे अखिल भारतीय सह संघटन मंत्री श्रीराम आरावकर उपस्थित होते. या प्रसंगी विद्या भारतीच्या संलग्नित शाळांचे मुख्याध्यापक व विद्या भारतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्ष म्हणून बळीराम रामदास चव्हाण (हिंगणघाट, जि. वर्धा), अँड. सत्यानंद भीमराव कांबळे (वाशीम) आणि सौ. प्रांजली प्रमोद जोशी (नागपूर) यांची निवड झाली आहे. मंत्री पदाची जबाबदारी नागपूरचे रोशन मधुकरराव आगरकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
सहमंत्री म्हणून दिलीप गुणवंतराव जोशी (वाशीम), समीर मुकुंदराव थोडगे (अकोला), उल्हास वामनराव इटानकर (रामटेक) रणदीप कंठीलाल बिसने (हिंगणघाट) यांची नियुक्ती झाली आहे. कोषाध्यक्ष म्हणून नागपूरचे अमित मधुकर भालेराव कार्य पाहणार आहेत.
कार्यकारिणी सदस्य म्हणून डॉ. मंगेश निलकंठ पाठक (नागपूर), मंगेश श्रीधरराव वानखेडे (अकोला), डॉ. शुभ्रा सोमनाथ रॉय (नागपूर) आणि आनंद विद्याधर देशपांडे (नागपूर) यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रांत संघटन मंत्री म्हणून शैलेश श्रीराम जोशी यांची पुनर्नियुक्ती करण्यात आली.
विद्या भारती ही अखिल भारतीयस्तरावर कार्य करणारी संघटना असून देशभरात तिच्या २० हजारांहून अधिक शाळा कार्यरत आहेत. विदर्भातील विद्या भारती संलग्नित शाळांमध्ये राष्ट्रभावना, संस्कार व सर्वांगीण शिक्षण यांचा संगम साधला जातो. आगामी कार्य योजनेत प्रत्येक शाळेत मातृशक्तीचे सप्तशक्ती सम्मेलन घेण्याची योजना आहे.
नव्या कार्यकारिणीचा प्रांतभरातून अभिनंदन करण्यात येत संदेश असून या कार्यकाळात विदर्भातील शैक्षणिक व संस्कारक्षम कार्याला अधिक गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.