अकोला दिव्य न्यूज : स्थानिक बिरला कॉलनी स्थित सन्मित्र पब्लिक स्कूल मधे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम जागवण्यासाठी सन्मित्र पब्लिक स्कूलमध्ये शाडू मातीपासून गणेशमूर्ती तयार करण्याची विशेष कार्यशाळा निसर्ग कट्ट्याच्या मार्गदर्शनमधे आयोजित करण्यात आली.

या कार्यशाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीऐवजी शाडू मातीच्या मूर्ती तयार करण्याचे महत्त्व समजावून सांगितले गेले. कुशल मार्गदर्शक व निसर्ग कट्टा चे सर्वेसर्वा अमोल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी उत्साहाने गणेशमूर्ती बनविण्याची पारंपरिक पद्धत शिकली.
विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हातांनी गणेशमूर्ती घडविताना अपार आनंद व्यक्त केला तसेच प्रदूषणमुक्त आणि निसर्गरक्षक गणेशोत्सव साजरा करण्याची शपथ घेतली. शाळेच्या शिक्षिका अर्पणा यादव व प्रेम अवचार यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या प्राचार्या राजपुत यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले व सर्वांना पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.