Saturday, June 22, 2024
HomeUncategorizedमोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म

मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार, देशाचा उद्धार करण्यासाठीच त्यांचा जन्म

अकोला दिव्य न्युज ब्युरो : बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतचा बेधडक आणि स्पष्टवक्तेपणामुळे सर्वपरिचीत आहे. नुकतेच कंगनाचा ‘तेजस’ सिनेमा प्रदर्शित झाला. त्यामध्ये तिने महिला वैमानिकाची भूमिका साकारली आहे. सिनेमा बॉक्सऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकलेला नाही. खराब स्टोरी, दिग्दर्शन यामुळे प्रेक्षकांनी सिनेमाकडे पाठ फिरवली आहे. या दरम्यान, तिने प्रमोशनसाठी विविध ठिकाणी भेटी दिल्या. तसेच, काही मान्यवरांसोबतही या चित्रपटाचं प्रमोशन केलं. आता, एका मुलाखतीत तिने नरेंद्र मोदी हेच आवडते पंतप्रधान असल्याचं म्हटलं. तसेच, मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार आहेत, असेही तिने म्हटले आहे.

कंगनाने तेजस चित्रपटाच्या प्रमोशननिमित्ताने देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली होती. त्यानंतर, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि युपीच्या कॅबिनेट मंत्र्यांसाठी कंगनाने तेजस चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनींगही केलं. कंगनाने स्वत: ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती देत फोटोही शेअर केले होते. आता, तिने एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं मोठं कौतुक केलंय.  मोदी हे श्रीकृष्णाचा अवतार आहेत, असेही तिने म्हटले. त्यावर, स्पष्टीकरण देताना, ज्याप्रमाणे एखादा अवतार असतो, तसेच मोदी ह्या देशासाठी एक अवतार आहेत. त्यांचा जन्म भारत देशाच्या उद्धारासाठीच झालाय, असे कंगनाने म्हटले.

नरेंद्र मोदी हे आपले आवडते नेते आहेत, आणि तेच आवडते पंतप्रधानही आहेत, असे कंगनाने म्हटले होते. यावेळी, कंगनाने श्रीकृष्ण आणि सुदामा यांचं उदाहरण दिलं. सुदामाने, श्रीकृष्ण हे देव आहेत म्हटल्यावर दुर्योधनाकडून त्यांची खिल्ली उडवण्यात आली. दिवसभरा महिलांसोबत नाचत असतो, ते कसले देव, असे म्हणत खिल्ली उडवली होती. जर तुमची धारणाच चांगली नसेल तर तुम्ही सर्वात ताकदवाद व्यक्तीबद्दलही अपशब्द काढता, असे कंगनाने म्हटले. तसेच, मला कोणीही ट्रोल केलं तरी फरक पडत नाही. जे लोकं सत्यासोबत आहेत, त्यांना माझं विधान योग्य वाटेल, असेही तिने म्हटले होते. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!