Saturday, June 22, 2024
Homeसामाजिकव्यावसायिकांना आवाहन ! दुपारी २ ते ४ पर्यंत प्रतिष्ठान बंद ठेवावी

व्यावसायिकांना आवाहन ! दुपारी २ ते ४ पर्यंत प्रतिष्ठान बंद ठेवावी

अकोला दिव्य न्युज ब्युरो : व्यापारी, उद्योजकांचे पाठीराखे आणि राजस्थानी समाज भूषण आमदार लालाजी उपाख्य गोवर्धन शर्मा यांची अंत्ययात्रा आज शनिवारी दुपारी २ वाजता आळशी प्लॉट येथून निघणार आहे. आळशी प्लॉट येथून अशोक वाटिका चौक, टॉवर, कश्मिर लॉज मार्गे भाजप कार्यालयात येईल. याठिकाणी भाजप व न्यु क्लॉथ मार्केट आणि बाजारपेठेच्या लोकांकडून सामुहिक श्रध्दांजली वाहण्यात येईल.

तदनंतर येथून टिळक मार्गे विठ्ठल रखुमाई मंदिर येथे अंत्ययात्रा पोहोचून या ठिकाणी जुने शहरवासी आपल्या लाडक्या नेत्याला आदरांजली वाहणार आहे. येथून ही यात्रा डाबकी रोड परिसरातून रेल्वे गेट व डावे वळण घेऊन अन्नपुर्णा माता मंदिर जवळील मांगीलाल शर्मा महाविद्यालयाच्या मैदानावर पोहचेल आणि जनसागराच्या साक्षात आमदार शर्मा यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येईल. अकोलेकरांकडून आपल्या जीवाभावाच्या नेत्याला शेवटचा निरोप दिला जात आहे. तेव्हा दुपारी २ ते ४ या कालावधीत सर्व व्यापारीबांधवानी आपापली दुकाने बंद ठेवून अंत्ययात्रेत सहभागी होऊन निरोप द्यावा.असे आवाहन महाराष्ट्र प्रादेशिक मारवाडी सम्मेलनाचे प्रांतीय अध्यक्ष निकेश गुप्ता, जिल्हा अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे व शहराध्यक्ष राजकुमार शर्मा यांनी केले आहे

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!