Tuesday, March 5, 2024
Home ताज्या बातम्या विक्रमादित्य ! विराट कोहलीचे ४९वे शतक, सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी

विक्रमादित्य ! विराट कोहलीचे ४९वे शतक, सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी

रोहित शर्माने ज्या प्रकारे सुरुवात केली होती, ती पाहता भारत आज ३५०-४०० धावा बनवेल असे वाटले. पण, दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ११ ते २५ षटकांत चांगला मारा केली. विराट कोहली व श्रेयस अय्यर खेळपट्टीवर असूनही त्यांना धावांचा वेग फार काही वाढवता आलेला नव्हता. मात्र, सेट झालेल्या जोडीने नंतर आफ्रिकेच्या गोलंदाजांना चोप दिला. दोघांच्या १३४ धावांच्या भागीदारीने भारताला कमबॅक करून दिले. पण, सर्वांना प्रतीक्षा होती ती विराटच्या ४९व्या शतकाची. मागील दोन सामन्यांत ( ८८ व ९५) त्याचे हे शतक थोडक्यात हुकले होते, परंतु आज त्याने ईडन गार्डनवर इतिहास रचला.

 रोहित शर्माच्या २४ चेंडूंत ४० धावांनी भारतासाठी पोषक वातावरण निर्माण केले होते. तो माघारी परतल्यनंतर शुबमन गिल ( २३) बाद झाला आणि पहिल्या १० षटकांत ९१ धावा चोपणाऱ्या भारतीय संघाला पुढील १५ षटकांत केवळ ५२ धावा करता आल्या. विराट कोहली व श्रेयस अय्यर यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. सुरुवातीला संथ खेळ करून सेट झाल्यानंतर विराट व श्रेयस यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली. यंदाच्या वर्ल्ड कपमधील सर्वाधिक 50+ धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने ( ६) डेव्हिड वॉर्नर ( २०१९) व रोहित शर्मा ( २०१९) यांच्याशी बरोबरी केली. या वर्ल्ड कपमध्ये ५०० धावा पूर्ण करणारा तो पहिला आशियाई फलंदाज ठरला. 

३७व्या षटकात विराट-श्रेयसची १३४ ( १५८ चेंडू) धावांची भागीदारी तुटली. लुंगी एनगिडीच्या चेंडूवर उत्तुंग फटका त्याने मारला अन् एडन मार्करामने झेल घेतला. श्रेयस ८७ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने ७७ धावांवर बाद झाला. भारताच्या चौथ्या क्रमांकावरील फलंदाजाने एकाच पर्वात सर्वाधिक ३ फिफ्टी प्लस धावांचा विक्रम श्रेयसने नावावर केला. त्याने सचिन तेंडुलकर ( १९९२), अजय जडेजा ( १९९९) आणि युवराज सिंग ( २०११) यांचा विक्रम मोडला. श्रेयसच्या विकेटनंतर धावांचा वेग पुन्हा मंदावला होता. विराट मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, परंतु चेंडू संथ गतीने बॅटवर येत असल्याने त्याला यश मिळत नव्हते. लोकेश राहुलने ( ८) मोठा फटका मारला, परंतु व्हॅन डेर ड्युसेनने सुरेख झेल घेतला. 

सूर्यकुमार यादवने ( २२) फटकेबाजी सुरू ठेवली. त्यांची २३ चेंडूवरील ३६ धावांची भागीदारी तब्रेझ शम्सीने तोडली. सूर्या रिव्हर्स स्वीप मारताना चेंडू ग्लोव्हजला लागला अन् क्विंटनने सुरेख झेल घेतला. विराटच्या ४९व्या शतकाची प्रतीक्षा आज संपली. वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या सचिनच्या विक्रमाशी आज विराटने बरोबरी केली. शतकाच्या जवळ आल्यानंतर विराट डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेला आणि त्याने १ – २ धाव घेण्यावर भर दिला. विराटने ११९ चेंडूंत १० चौकारांच्या मदतीने शतक पूर्ण केले. १४ वर्षांपूर्वी जिथून हा प्रवास सुरू झाला होता तिथेच विराटने हे ऐतिहासिक शतक झळकावले. विराटने २७७ इनिंग्जमध्ये हा पराक्रम केला, तर सचिनने ४५२ इनिंग्ज खेळल्या.

RELATED ARTICLES

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

भाजपला टेंशन ? शिंदे गटाचा १८ जागांवर दावा ! खासदारांच्या बैठकीत झाले एकमत

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाकडून १८ जागांवर दावा करण्याचे निश्चित करण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांकडून देण्यात आली...

चिठ्ठी आयी है…..पंकज उधास यांचं निधन ! ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आपल्या जादुई आवाजाने रसिकांच्या मनावर मोहिनी घालणाऱ्या आणि विविध गझल गाणाऱ्या गायक पंकज उधास यांचं निधन झालं...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

महाराष्ट्रातून कोण-कोण ? भाजपची शुक्रवारी बैठक : २३५ उमेदवारांवर विचार होण्याची शक्यता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : दोन डझन राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील उर्वरित सुमारे २३० जागांसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची...

अमित शाह अकोल्यात ! उद्या मंगळवारी सहा लाेकसभा मतदार संघांचा घेणार आढावा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : आगामी एप्रिल महिन्यात हाेऊ घातलेल्या लाेकसभा निवडणुकीसाठी भाजपाने संचलन समिती गठीत केली आहे. या समितीकडून लाेकसभा मतदार...

अकोल्यात विना वारसदारांची संपत्ती लूटणारी टोळी सक्रीय ! बनावट मृत्यूपत्र व खोटी तक्रारींचा आधार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरातील प्रतिष्ठीत, उच्चभ्रू वस्तीतील वारसदार नसलेली कोट्यावधी रुपयांची संपत्ती बनावट दस्तावेज करून हडपणारी टोळी अकोल्यात...

बच्चू कडू यांच्यासाठी चक्क कायद्यात बदल ! हा निर्णय सहकार चळवळीच्या मुळावर उठणारा

अकोला दिव्य न्युज ब्युरो : महाराष्ट्रातील महायुती सरकारचा घटकपक्ष असलेल्या प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांचे अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अध्यक्षपद...

Recent Comments

error: Content is protected !!