Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedअकोला : बँक महिला व्यवस्थापकाची फसवणूक

अकोला : बँक महिला व्यवस्थापकाची फसवणूक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : पार्टटाईम जॉबच्या फेसबुकवरील भुलथापांना बळी पडत, अकोटातील एका बँकेच्या महिला व्यवस्थापकाने दिलेल्या लिंकवर क्लिक केले आणि एका मोबाइल नंबरवरून तिला टास्क देण्यात आला. तिने त्यावर नोंदणी केली आणि ठगांनी सांगितल्यानुसार ती रिचार्ज करीत गेली. या ठगांनी नंतर तिला पैसा व त्यावरील नफा न देता, तिची ४ लाख ८९ हजार रूपयांनी फसवणूक केली. या प्रकरणात अकोट शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अकोट येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय विवाहितेच्या तक्रारीनुसार ती अकोट येथील बँकेत व्यवस्थापक पदावर काम करते. काही दिवसांपूर्वी तिला दुपारी तिच्या फेसबुक अकाउंटवर पार्ट टाईम जॉबसाठी ऑफर होती. त्यामुळे तिने फेसबुक अकाउंट वरील सदर लिंकवर क्लिक केले असता. तिच्या मोबाइल नंबर एका मोबाइल नंबरवरून एक टास्क दिला. त्यामध्ये त्यांनी तिला एक टेलीग्रामची लिंक पाठविली व त्यामध्ये नाेंदणी करायला सांगितले. तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे विवाहिता रिचार्ज करीत गेली. त्यामध्ये पहिली अमाऊंट ५०० रूपये होती.

रिचार्ज केल्यानंतर त्यांनी सांगितले प्रमाणे ती टास्क करत गेली. त्यामध्ये त्यांनी विकण्यासाठी प्राॅडक्ट दिले ते तिने सेल केले. त्यानंतर त्यांनी तिला २०० रूपये नगदी अकाउंटला जमा केले. त्यानंतर त्यांनी तिला पुन्हा रिचार्ज मारण्यास सांगितले. त्यानुसार तिने १० हजार रूपयांचा रिचार्ज केला. त्यानंतर त्यांनी बँक महिला व्यवस्थापकाला पुन्हा टास्क दिला, तोही तिने टास्क पुर्ण केला. परंतु त्यांनी तिला टास्क पूर्ण करूनसुध्दा तिचे पैसे व नफा परत केला नाही व तिचे अडकलेले पैसे परत करण्यासाठी पुन्हा टास्कसाठी रिचार्ज करण्याबाबत सुचना देत गेले व त्याप्रमाणे ती पती व आईच्या बँक अकाउंटवरून वेळोवेळी एकूण ४ लाख ८९ हजार रूपयांचे रिचार्ज करीत गेली. परंतु भामट्यांनी तिला पैसे परत करता, तिची फसवणूक केली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!