Saturday, July 27, 2024
HomeUncategorizedपाकिस्तानचा गाशा गुंडाळला ! भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली...

पाकिस्तानचा गाशा गुंडाळला ! भारत विरुद्ध न्यूझीलंड पहिली सेमीफायनल १५ ला

अकोला दिव्य न्युज ब्युरो : वर्ल्डकप २०२३ मधील ४४ वी लढत कोलकाताच्या इडन गार्डन्स स्टेडियमवर पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात सुरू झाली आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली आणि पाकिस्तान आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ च्या सेमीफायनलच्या शर्यतीतून बाहेर देखील झाला.

पाकिस्तानला सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी इंग्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवण्याची गरज होती. प्रथम फलंदाजी केल्यास पाकिस्तानला २८७ चेंडूत तर धावांचा पाठलाग करताना २८४ चेंडू राखून विजय मिळवण्याची गरज होती. म्हणजे इंग्लंडचा संघ जो टार्गेट देईल ते टार्गेट पाकिस्तानला ३ षटकात पूर्ण करावे लागले आणि ही गोष्ट अशक्य आहे. आता वर्ल्डकपमधील सेमीफायनलचे चित्र स्पष्ट झाले आहे.

भारतासह द.आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड हे संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत.वर्ल्डकप २०२३ मध्ये ८ पैकी ८ लढती जिंकून भारतीय क्रिकेट संघाने सर्वप्रथम सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले होते. भारत हा स्पर्धेतील एकमेव संघ आहे ज्यांचा एकाही सामन्यात पराभव झालेला नाही. साखळी फेरीतील भारताची अखेरची लढत १२ नोव्हेंबर रोजी बेंगळुरू येथे नेदरलँड्सविरुद्ध होणार आहे. भारतानंतर आफ्रिकेने ९ पैकी ७ लढती जिंकून सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.

अफगाणिस्तानचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने देखील अंतिम ४ मध्ये स्थान मिळवले.चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघात चुरस होती. आता चौथ्या स्थानावरील संघ निश्चित झालाय. पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यातील मॅच संपण्याआधी न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये पोहोचला. कारण पाकिस्तानचा संघ इतका मोठा विजय मिळवू शकणार नाही. २०१९च्या वर्ल्डकपमध्ये देखील न्यूझीलंड आणि पाकिस्तान सोबत असेच झाले होते. तेव्हा न्यूझीलंडने चांगल्या रनरेटसह सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता.

पहिली सेमीफायनल भारत विरुद्ध न्यूझीलंड, १५ नोव्हेंबर, वानखेडे स्टेडियम, मुंबई

दुसरी सेमीफायनल द.आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया, १६ नोव्हेंबर, इडन गार्डन्स, कोलकाता

फायनल मॅच- १९ नोव्हेंबर, नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!