Tuesday, June 25, 2024
Homeताज्या घडामोडीअकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसच्या प्रत्येकी ४ फेऱ्या रद्द !

अकोला मार्गे धावणाऱ्या हैदराबाद-जयपूर एक्स्प्रेसच्या प्रत्येकी ४ फेऱ्या रद्द !

अकोला दिव्य न्युज ब्युरो : उत्तर पश्चिम रेल्वे झोन अंतर्गत यार्ड रिमॉडलिंग तांत्रिक कामे करण्यासाठी काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या असून, यामध्ये दक्षिण व उत्तर-पश्चिम भारताला अकोला मार्गे जोडणारी हैदराबाद-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा समावेश आहे. २७ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत या एक्स्प्रेसच्या अप व डाऊन प्रत्येकी चार फेऱ्या रद्द करण्यात आल्याने अकोलेकर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक १२७२० हैदराबाद-जयपुर सुपरफास्ट एक्स्प्रेस २७ नोव्हेंबर, २९ नोव्हेंबर, ४ डिसेंबर व ६ डिसेंबर रोजी प्रस्थान स्थानकावरूनच धावणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२७१९ जयपुर-हैदराबाद सुपरफास्ट एक्स्प्रेस २९ नोव्हेंबर, १ डिसेंबर, ६ डिसेंबर व ८ डिसेंबर रोजी रद्द करण्यात आली आहे. या गाड्या ऐन सणासुदीत रद्द झाल्याने आधीच नियोजन करून ठेवलेल्या अकोलेकरांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!