Thursday, October 10, 2024
Homeशैक्षणिकअकोल्यातील 'त्या' कॉलेजमधील घोटाळ्याला 'चाप' कोणाचा ! एका संस्थेने दिलेली रक्कम 'या'...

अकोल्यातील ‘त्या’ कॉलेजमधील घोटाळ्याला ‘चाप’ कोणाचा ! एका संस्थेने दिलेली रक्कम ‘या’ खात्यात का?

अकोला दिव्य न्युज ब्युरो : प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या तरतुदींनुसार अकोला शहरातील ‘त्या’ ख्यातनाम महाविद्यालयातील आर्थिक घोटाळा हा सरळसरळ ‘मनीलॉडरिंग’ असून, प्रकरण उघडकीस आल्यानंतरही अद्याप कायदेशीर कारवाईचे पाऊल उचलले गेले आहे. संशयितांना अभय मिळवून देण्यासाठी प्रयत्न होत असताना, या प्रकरणातील अनेक धक्कादायक व्यवहार समोर येत आहे.

शहरातील या शैक्षणिक संस्थेकडून संचालित महाविद्यालयाला अलिकडच्या काही वर्षांत शहरातील अन्य एका संस्थेकडून दरवर्षी, वर्षात चार वेळा देण्यात आलेली ठराविक रक्कम प्राचार्यांची स्वाक्षरीने संचालित होणा-या ‘या’ खात्यात जमा करण्यात आली आहे.अशी विश्वसनीय माहिती हाती आली आहे. या ठराविक रक्कमेतून कामाचा मोबदला म्हणून काहींना काही रक्कमही दिली. पण कामाचा मोबदला म्हणून पैसे घेणारे कर्मचारी कमी आणि गोतावळ्यातील लोकं जास्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरवर्षी ठराविक रक्कम देणा-या संस्थेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता प्राचार्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पण मिळणारी रक्कम संस्थेच्या मुळ खात्यात का जमा करण्यात आली नाही. हा महत्त्वाचा मुद्दा असून, नियमानुसार ‘त्या संस्थेच्या कामासाठी नियमित कर्मचाऱ्यांना प्राधान्य देणे आवश्यक असताना, का डावलले? या मुद्द्यांचा खुलासा होणे आवश्यक आहे.

प्राचार्यांना हा व्यवहार करण्याची गरज का भासली? या खात्याचे अंकेक्षण का करण्यात आले नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून यासाठीचा ‘बदल’ मंजूर करण्यात आला आहे का? संस्थेच्या मंजूर मुळ नियमावलीला अनुसरून कामकाज झाले काय? असे अनेक कायदेशीर प्रश्न या व्यवहाराच्या पारदर्शकतेवर निर्माण होत आहे. बॅकेत खाते उघडण्यासाठी संस्थेचा मंजूर करण्यात आलेला ठराव आहे काय ? यंदाच्याच लेखापरीक्षणात हे प्रकरण कसे उघड झाले ? उघडकीस आलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सात जणांच्या चौकशी समितीला संस्थेच्या आमसभेची मान्यता घेणे बंधनकारक आहे काय, असे अनेक कायदेशीर मुद्दे अद्याप गुलदस्त्यात आहे.

शहरातील या नामांकित संस्थेत प्राध्यापकपदावर नियुक्ती करण्यासाठी लाखो रुपये डोनेशन घेतल्याचे प्रकरण प्रसार माध्यमांनी चव्हाट्यावर आणले होते. तर आजपावेतो डोनेशनच्या रक्कमेची कशी विल्हेवाट लावण्यात आली ! हा संशोधनाचा विषय आहे. अकोला शहरातील या शैक्षणिक संस्थेसाठी मकरसंक्रांतीचा दिवस ऐतिहासिक आहे.कारण याचं दिवशी शहरातील प्रबुद्ध पुण्य व परोपकारी लोकांनी या संस्थेची स्थापना केली. सुरुवातीला एका बंगल्यात शाळा सुरू केली. .. मध्ये पहिले महाविद्यालय सुरू करीत शिक्षणाची गंगा सामान्य माणसाच्या घरात पोहचवली. दानदात्यांनी कुठलीही अमिषा न बाळगता सढळ हाताने मदत केल्याने, महाविद्यालयाच्या सर्व इमारती ज्ञानदानाचे पवित्र मंदिर झाले पण आता या मंदिरावर आर्थिक अफरातफरीचे डाग लागत आहे. या घोटाळ्याना ‘चाप’ कोण लावणार, हा मोठा प्रश्न उभा ठाकला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!