Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीअकोल्यात जोरदार पाऊस ! विजेच्या गडगडाटासह मध्यरात्रीपासून सुरुवात : रब्बी पिकांचे नुकसान

अकोल्यात जोरदार पाऊस ! विजेच्या गडगडाटासह मध्यरात्रीपासून सुरुवात : रब्बी पिकांचे नुकसान

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला शहरासह जिल्ह्यात काल रविवारी मध्यरात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपून काढले.वृत्त लिहिस्तोवर पावसाचा जोर कमी झाला पण पाऊस सुरू आहे.वादळी वाऱ्यामुळे शहराचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. रात्री उशिरा पर्यंत विजेचा कडकडाट व पाऊस सुरूच होता. शनिवारला हवामान खात्याने अलर्ट दिला होता. हा पाऊस दोन दिवस राहण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाने राज्यात तीन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविली होती. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात तसेच अकोला शहरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवर पाणी साचले होते तसेच रस्त्यालगतच्या मोठ्या नाल्यांमधील सांडपाणी सखल भागातील रहिवाशी वस्त्यांमध्ये व काही दुकानांमध्ये शिरले. या पावसाने पुन्हा एकदा महापालिका प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल केल्याचे दिसून आले.

वादळी वाऱ्यामुळे जुने शहरासह गोरक्षण, मलकापूर भागात काही ठिकाणी वृक्षांच्या फांद्या जमिनीवर कोसळल्या होत्या. दरम्यान, या नैसर्गिक संकटामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा संकटाच्या खाईत लोटले आहे. खरीप हंगामातील कपाशीसह रब्बी हंगामातील कांदा, हरभरा, गहू व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे साथरोग बळावण्याची दाट शक्यता आहे. वातावरणातील बदलाचा सर्वाधिक त्रास लहान मुले व वयोवृद्ध नागरिकांना होणार

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!