Saturday, July 27, 2024
Homeराजकारणअकोल्यात अतिक्रमणधारक हक्क परिषद 16 जानेवारीला !रिपाइं (आ) अकोला जिल्ह्याची बैठक

अकोल्यात अतिक्रमणधारक हक्क परिषद 16 जानेवारीला !रिपाइं (आ) अकोला जिल्ह्याची बैठक

अकोला दिव्य न्युज ब्युरो : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) अकोला जिल्ह्याची बैठक प्रदेश सहसंघटक अशोक नागदेवे यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.बैठकीत जिल्ह्यातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यामध्ये जिल्हा महासचिवपदी अँड प्रकाश आठवले, महिला आघाडीच्या कार्याध्यक्ष अर्चना धांडे, जिल्हा कोषाध्यक्षपदी प्रकाश तायडे, जिल्हा सचिवपदी अँड कुलदीप इंगळे, अल्पसंख्यांक आघाडीच्या अध्यक्षपदी अब्दुल बशीर अब्दुल कहर, बाळापूर तालुका युवक आघाडीच्यापदी मिलिंद सुर्वे, जिल्हा उपाध्यक्षपदी अनिल वाकोडे, बाळापूर तालुका उपाध्यक्षपदी माणिक जंजाळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र अशोक नागदेवेंच्या हस्ते देण्यात आले.

बैठकीला जिल्हाध्यक्ष सुनील अवचार यांनी मार्गदर्शन करतांना भूमिहीन, बेघर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी यांचे अतिक्रमण शासनाच्या जीआर मधील तरतूदीमध्ये येत असेल तर अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी कायदेशीर लढा देऊन अतिक्रमणधारकांच्या पाठीशी उभे राहु असे आश्वासन दिले. सर्वोच्च न्यायालयाने 28 जानेवारी 2011रोजी नोंदविलेल्या निरीक्षणात भूमिहीन, बेघर मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व आदिवासी अतिक्रमणधारकांना शासनस्तरावर विचार करून त्यांचे अतिक्रमण निकषित करू असे आदेशात सांगितले आहे.असे असताना देखील नोटीस बजावल्या आहेत. शासनाचे हे कृत्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे. तेव्हा अतिक्रमणधारकांना न्याय देण्यासाठी येत्या 16 जानेवारी 2024 रोजी अकोला जिल्ह्यात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखली अतिक्रमणधारक हक्क परिषदेचे आयोजन केले आहे.या परिषदेला हजारोच्या संख्येने अतिक्रमण धारकांनी हजर राहावे असं आवाहन करण्यात आले.

बैठकीचे सूत्रसंचालन युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बुद्धभूषण गोपनारायण तर आभार बाळासाहेब दामोदर यांनी मानले.बैठकीला तेल्हारा तालुकाध्यक्ष गणेश थोरात, मूर्तिजापूर तालुकाध्यक्ष अजय प्रभे, मूर्तिजापूर तालुका महासचिव समाधान वानखडे, बार्शीटाकाळी तालुका अध्यक्ष जुगलकिशोर जामाणिक , जनार्धन खिल्लारे, शेख सलीम पहेलवान्, अकोट तालुकाध्यक्ष अविनाश राय, अकोट शहराध्यक्ष दयानंद तेलगोटे, दिनेश पेटकर, अशोक गवई, पातूर तालुकाध्यक्ष पंडित सदार, अकोला तालुकाध्यक्ष बाळासाहेब दामोदर, बाळापूर तालुकाध्यक्ष विलास अवचार, किशोर नीलकंठ, आदिवासी सेल जिल्हाध्यक्ष बाळाकृष्ण उईके, जिल्हा उपाध्यक्ष जगदेव हिवराळे, देवाराव सपकाळ, देविदास डोंगरे, दशरथ अवचार, अनिल वाकोडे, पंजाबराव किर्दक, बंडूभाऊ कोकणे, विवेक किर्दक, दिलीप थोरात, विलास पाटील, सुरज तायडे, अजय बोदडे, भीमराव तायडे, भाष्कर पाचपोर, गजानन बोदडे, सिद्धार्थ गवई, गजानन तायडे, भाष्कर गवई, राजकुमार खांडेकर, भाऊरावं वानखडे, रवींद्र कांबळे, रामेश्वर खांडेकर, अजय चव्हाण, पांडुरंग चव्हाण, ब्रम्हदेव डोंगरे, दिपक विवेक, सनी मोहाडे, जयकुमार इंगळे, माणिक वरघट, बंडू बनसोड, राजू खानपट्टे, बळीराम वानखडे, विष्णू खंडारे, नाजुकरव् भटकर, राजेन्द्र बंडू, विकास तेलगोटे, शेषरावं तायडे, अक्षय शिराळे, शुद्धोधन ओइंबे, अभिमान ओइंबे, गंगाबाई मोरे, वंदनाताई बडवे, वेनू डोंगरे, लिलाबाई शेजवळ, उज्वला नायक, सरिता मनवर, लिलादेवी भरतीया, सखु खुळे, रुख्मा गायकवाड, राजू निशानराव, नारायण खंडारे,अमोल वाहुरवाघ, जयप्रकाश वाहुरवाघ , सिद्धार्थ तेलगोटे, सागर जामाणिक, रामभाऊ पंचांग, रमेश सदार, देवराव प्रधान, गोपाळरावं थोरात, बबन गवई, भिकाजीं अंभोरे, अर्जुन गवई, अशोक वाकोडे, लतीफ खान रहीम खान, चिंतामण वानखडे, अवचित सदानशिव, रवी हिवराळे, किसन पाचपोर, रामराव अलकाळ, श्रावण सोनोने, रामदास भटकर, रामकृष्ण पुसाम, कोंडीराम ढोके, संजय लोखंडे, मनोहर गिते, अर्जुन दामोदर, ज्ञानादेव वानखडे यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्येने पदाधिकारी हजर होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!