Saturday, July 27, 2024
Homeताज्या घडामोडीब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला ! इंदूर -पुणे महामार्गवरील वाहतुक पूर्णपणे बंद

ब्रिटिशकालीन रेल्वे पूल कोसळला ! इंदूर -पुणे महामार्गवरील वाहतुक पूर्णपणे बंद

अकोला दिव्य न्युज ब्यूरो : मनमाड शहरातून जाणारा इंदूर-पुणे महामार्गावरील ब्रिटिशकालीन जुना रेल्वे पूल (ओव्हर ब्रिज) मध्यरात्री खचला असून आज बुधवारी पहाटे त्याचा काही भाग कोसळला. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली आहे. या दुर्घटनेत जीवित हानी झाली नाही. मात्र धुळे-शिर्डी मार्गावरील हाच एक रेल्वेवरील प्रमुख पूल असल्याने वाहतुकीची समस्याच गंभीर होणार आहे.

या ब्रिटीशकालीन पुलाचा मध्यभाग ढासळल्यामुळे इंदूर-पुणे महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील पुण्याकडील वाहतूक येवला येथून तर इंदूर येथून येणारी वाहतूक मालेगाव येथून वळवण्यात आली. पण यामुळे मनमाड शहराचे दक्षिण-उत्तर असे दोन भाग झाले असून साधी लहान चारचाकी गाडीही दुसऱ्या भागात जाऊ शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

सुदैवाने यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसली तरी या पुलाची मुदत संपली असल्याने त्याचे मागेच संरचनात्मक लेखापरीक्षण झाले होते. मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारची सुधारणा करण्यात आली नव्हती. अभियंता संघटनेने वळण रस्त्यासाठी अनेकदा निवेदने देऊन पाठपुरावा केला. पण त्याचाही उपयोग झाला नाही. या परिस्थितीत पहाटे पाच ते सव्वा पाच वाजेच्या दरम्यान जुन्या पुलाचा पूर्वेकडील मोठा भाग कोसळला. सुरक्षा कठड्यासह मातीचा ढिगारा खाली गेला. यावेळी पुलावर वाहन नसल्याने दुर्घटना टळली आहे.

पुलाची जबाबदारी टोल कंपनीकडे
पूर्वी हा महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाकडे होता. गेल्या १५ वर्षांपासून हा पूल एमएमकेपीएल या टोल कंपनीकडे बीओटी तत्वावर हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्याच्या देखभाल, दुरुस्तीचे काम काम याच कंपनीकडे होते. हा पूल आणि महामार्ग धोकादायक असून वळण रस्ता करण्यात यावा, अशी बऱ्याच वर्षांपासून मागणी आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!