Saturday, July 27, 2024
Homeराजकारणभाजपाने ३५ हजार कोटींची लूट केली ! आंबेडकरांचा मोदींसह आरएसएसवर जोरदार प्रहार

भाजपाने ३५ हजार कोटींची लूट केली ! आंबेडकरांचा मोदींसह आरएसएसवर जोरदार प्रहार

अकोला दिव्य न्युज ब्युरो : भारतात १९५० ते २०१४ या कालावधीत भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व घेणारे फक्त ७ हजार ६४४ हिंदू कुटुंबे आहेत. मात्र २०१४ ते २०२३ या कालावधीत ज्यांची मालमत्ता किमान ५० लाख रुपये आहे अशा १४ लाख कुटुंबांनी भारताचे नागरिकत्व सोडून परदेशी नागरिकत्व स्वीकारलं. अन हे हिंदूराष्ट्र करायचं म्हणत आहेत, थू तुमच्या जिंदगानीवर. अशा कठोर शब्दात अँड प्रकाश आंबेडकर यांनी अनेक मुद्द्यांवर मोदींसह भाजपा-आरएसएसवर जोरदार प्रहार केला.

या मूर्ख नालायक सरकारच्या नादी आम्हाला लागायचं नाही. आम्हाला आमच्या बापजाद्यांची इभ्रत वाचवायची आहे. म्हणून आम्ही नागरिकत्व सोडलं, असे परदेशी गेलेले भारतीय म्हणत असतात. भाजपाने या १४ लाख लोकांवर गुमनाम जगण्याची वेळ आणली आहे. आतापर्यंत आम्ही निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न केला नाही, पण या निवडणुकीमध्ये आम्ही सत्तेमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही,असंही आंबेडकरांनी नमूद केलं.

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की, नरेंद्र मोदी हे लोकशाहीचे नाहीत, तर ठोकशाहीचा पंतप्रधान आहेत. लोकसभेच्या निवडणुका होईपर्यंत ते एकही पत्रकार परिषद घेणार नाहीत. मोदी पत्रकारांसमोर जाऊन उत्तर द्यायला घाबरतात. मोदी पत्रकारांना घाबरतात, कारण पत्रकार त्यांच्यापेक्षा हुशार आहेत. ते असे भित्रे पंतप्रधान आहेत. त्यांची नावालाच फक्त ५६ इंच छाती आहे.मागील दहा वर्षात हजारोंच्या संख्येने आपले सैनिक शहीद झाले आहेत. कारगिलच्या युद्धातही एवढे सैनिक शहीद झाले नव्हते. ते भाजपा-आरएसएस सरकारच्या काळात झाले आहेत, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.

सांगलीत काल बुधवार २९ नोव्हेंबरला वंचितच्या ‘सत्ता संपादन सभेत’ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका करताना सांगितले की, आरएसएस-भाजपाच्या १० वर्षांमधील सत्तेचा हिशोब मांडायला सुरुवात केली पाहिजे. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आरएसएस-भाजपाच्या १० वर्षांमधील सत्तेचा हिशोब मांडायला सुरुवात केली पाहिजे. इथला व्यापारी आणि सरकार यांच्यात संगनमत झालं की, टोमॅटोचा तुटवडा करायचा, त्याचा भाव वाढवायचा आणि निवडणुकीचा खर्च काढून घ्यायचा आणि पुन्हा भाव कोसळवायचा प्रकार झाला. सरकारने या देशात टोमॅटोची तूट निर्माण करून ३५ हजार कोटींची लूट केली आहे.असा आरोप आंबेडकर यांनी केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!