Tuesday, May 21, 2024
Home गुन्हेगारी अकोला न्यायालयाने ठोठावली २० वर्ष सक्त मजुरी कारावासाची शिक्षा ! डीएनए...

अकोला न्यायालयाने ठोठावली २० वर्ष सक्त मजुरी कारावासाची शिक्षा ! डीएनए अहवाल ठरला महत्त्वपूर्ण

अकोला दिव्य न्युज ब्युरो : लहान मुलांना पळवून नेणे व अल्पवयीन मुलावर अत्याचार केल्याप्रकरणात वर्धा जिल्ह्यातील लादगड येथील सराईत गुन्हेगार सुधाकर उर्फ शंकर उर्फ चंद्र्या जंगलजी उईके (३८) याला अतिरिक्त जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. जे. शर्मा यांच्या न्यायालयाने काल ३० नोव्हेंबर रोजी २० वर्ष सक्त मजुरी कारावासाची शिक्षा ठोठावली.

सुधाकर उईके हा शेगाव येथे कचरा गोळा करणे व भिक मागायचा. कोविड लॉकडाउन काळात २२ ऑगस्ट २०२० रोजी तो एका १५ वर्षीय पीडितेसोबत चाईल्ड हेल्पलाईनचे समन्वयक पद्माकर सदाशिव व त्यांच्या चमुला अकोला येथील रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक ६ वर र संशयास्पद स्थितीत आढळून आला होता. ही माहिती रेल्वे पोलिसांना देण्यात आली. आरोपीला ताब्यात घेवून पीडित मुलीस बालकल्याण समिती समोर हजर केले. वैद्यकीय तपासणीनंतर पीडिता गरोदर असल्याचे समोर आले होते.. त्यानंतर पीएसआय तानाजी बहिरम यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

लॉकडाउनमुळे वैद्यकीय अहवाल व इतर प्राथमिक अहवाल उशिरा प्राप्त झाले होते. त्या दरम्यान आरोपी फरार झाला होता. पोलिसांनी त्याला वर्धा येथून पुन्हा अटक केली. त्याच्याविरूद्ध तत्कालिन तपास अधिकारी किरण साळवे यांनी वि. न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. न्यायालयात खटला चालल्यानंतर या प्रकरणात सरकारतर्फे एकूण १९ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी-पुराव्यांदरम्यान पोलिसांनी वारंवार प्रयत्न करुनही पीडिता मिळून आली नाही. तिच्या साक्षी शिवाय अन्य साक्ष पुराव्याचे आधारे आरोपीस दोषी ठरविण्यात आले.सरकार पक्षाचा पुरावा ग्राह्य मानुन न्यायालयाने आरोपी सुधाकर उर्फ शंकर उर्फ चंद्र्या जंगलुजी उईके यास भांदवि व पोस्कोच्या विविध कलमा अन्वये २० वर्ष कारावास व ३० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

सर्व शिक्षा आरोपीला एकत्रित भोगावयाच्या आहेत. दंडाची एकूण रक्कम ३० हजार रुपये पीडितेच्या बाळास देण्यात यावी व त्याबाबत संबंधितांनी ती वयस्क होईपर्यंत रक्कम तिचे नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये ठेवण्यात यावी, असे आदेश दिले. या प्रकरणात सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी वकील किरण खोत यांनी बाजू मांडली. कोर्ट पैरवी प्रिया शेंगोकार व रेल्वे पोलिस पैरवी अनिल खोडके यांनी सहकार्य केले.

डीएनए अहवाल ठरला महत्त्वपूर्ण
या प्रकरणात डीएनए चाचणीचा अहवाल महत्त्वाचा ठरला. पीडिता ही गोंदिया जिल्ह्यात तिची बहिण व जावई यांच्या घरी गेली व तेथे तिने बाळास जन्म दिला. तिने हे बाळ नातेवाईकांच्या मदतीने दत्तक देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पीडिता व बाळ शोधून वैद्यकीय तपासणीसाठी अकोला येथे आणले. डीएनए चाचणीकरिता रक्त नमुने घेतले व बाळास शिशू गृहात ठेवले.

न्याय वैज्ञानिक प्रयोग शाळा अमरावती येथे चाचणी करून अहवाल पाठविला. त्यानुसार आरोपी व पीडिता हे त्या नवजात बालकाचे जैविक माता पिता असल्याचे सिद्ध झाले. यात डीएनए विभागाचश तंत्रज्ञ सिध्दार्थ मोरे अमरावती यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

RELATED ARTICLES

संपत्ती आणि सत्तेचा माज ! ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवालसह 4 जणांवर गुन्हा : पण.. प्रश्न कायमच

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : संपत्ती,सत्ता कमविण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तो कसं कमवायचे हवा, हा अधिकार देखील आहे.पण याच सत्ता,...

अकोल्याची मोठी बातमी ! अकोला खदान पोलिस ठाण्याचे ठाणेदार सायरेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अकोला दिव्य न्युज ब्युरो : अकोला खदान पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस निरीक्षकाने पोलिस खात्यात कार्यरत पोलिस हवालदाराच्या मुलीच्या फ्लॅटमध्ये शिरून पिस्तुलाच्या धाकावर...

अकोल्यात अवैध सावकारी विरोधात धाडसत्र ! तीन ठिकाणांवरून आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त

अकोला दिव्य न्युज ब्युरो : शहरात अवैध सावकारीच्या तक्रारीवरून महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०२४ चे कलम १६ अंतर्गत शनिवारी तीन ठिकाणी धाड...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

ट्रोलिंगने महिलेचा बळी ? चिमुकल्याच्या बचावाचा Video व्हायरल झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा संशय!

अकोला दिव्य न्युज ब्युरो : ऑनलाईन ट्रोलिंगमुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागल्याच्या घटना गेल्या काही काळात समोर आल्या आहेत. काही बाबतीत हे...

संपत्ती आणि सत्तेचा माज ! ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवालसह 4 जणांवर गुन्हा : पण.. प्रश्न कायमच

गजानन सोमाणी • एडिटर इन चीफ : संपत्ती,सत्ता कमविण्याचा प्रत्येकाला हक्क आहे. तो कसं कमवायचे हवा, हा अधिकार देखील आहे.पण याच सत्ता,...

विदर्भ विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. शिरीष थोरात तर सचिवपदी डॉ. श्रीराम लाहोळे

अकोला दिव्य न्युज ब्युरो : विदर्भ नेत्रतज्ञ सोसायटीच्या अध्यक्षपदी अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ. शिरीष थोरात तर अकोला येथील नेत्रतज्ञ डॉ.श्रीराम लाहोळे यांची...

उद्या 12 वीचा निकाल जाहिर होणार ! गेल्यावर्षी राज्याचा निकाल ९१.२५ टक्के होता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट (सीआयएससीई) एक्झामिनेशनने (सीआयसीएसई) या शिक्षण...

Recent Comments

error: Content is protected !!