Saturday, July 20, 2024
Homeताज्या घडामोडीकाटेपूर्णा नदीत उडी घेऊन मुलासह महिलेची आत्महत्या ! घटस्फोटानंतरही त्रास कायम होता

काटेपूर्णा नदीत उडी घेऊन मुलासह महिलेची आत्महत्या ! घटस्फोटानंतरही त्रास कायम होता

अकोला दिव्य न्युज ब्युरो : घटस्फोटनंतर माहेरी राहणाऱ्या महिलेने पुर्वीच्या पतीकडून केल्या जाणाऱ्या सततच्या त्रासाला कंटाळून अखेर आपल्या सहा वर्षीय चिमुकल्या मुलासह महिलेने अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा नदीत उडी घेऊन आत्महत्या केली. पतीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवलं. अश्विनी निलेश आष्टाणकर (३३) आणि शिवांश (६) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत.

कुरणखेड नदीपात्रात आपल्या मुलाला मिठीत घेऊन एका महिलेनं आत्महत्या केल्याची माहिती बोरगाव मंजू पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात रवाना केले. घटनास्थळाचा पंचनामा करताना पोलिसांना आढळून आलेल्या पर्स मधील ओळखपत्राने मृतांची ओळख पटली. मृतक अश्विनी वर्धा येथील ‘केडीएम’ शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. घटनास्थळी सुसाईड नोट देखील आढळून आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अश्विनी आणि शिवांश हे दोघेही कालपासून बेपत्ता असल्याची तक्रार वर्ध्याच्या रामनगर पोलीस ठाण्यात नमूद होती. अश्विनी ही शिवांशला घेऊन शाळेत जाते म्हणून काल सकाळी घरून निघाली होती. रात्री बराच वेळ झाला तरी मायलेक घरी परतले नाहीत. नातेवाईकांनी इतर ठिकाणी दोघांचाही शोध घेतला. मात्र कुठलाही प्रकारचा सुगावा हाती लागला नाही. अखेर पोलिसात मिसिंग तक्रार नमूद करावी लागली. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार दोघेही आज सकाळी अकोला जिल्ह्यातील मुर्तीजापुर तालुक्यातल्या कुरणखेडला पोहोचले.

अश्विनीचा झाला होता घटस्फोट
वर्धा येथील महाकालकर कुटुंबातील अश्विनीचा विवाह नागपूरच्या निलेश आष्टाणकर सोबत झाला होता. सुरुवातीला दोघे आनंदाने नांदले. लग्नानंतर त्यांना एक मूल झाले. त्यानंतर सातत्याने दोघांमध्ये छोट्या कारणांवरून वाद व्हायला लागले. या वादाला कंटाळून अश्विनीनं निलेशला घटस्फोट दिला आणि गेल्या सहा वर्षांपासून मुलासह वर्ध्यात माहेरी राहत होती.

घटस्फोटानंतरही त्रास कायम; सुसाईड नोटमध्ये नमूद
अश्विनीनं आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या आत्महत्येला पती जबाबदार आहे. घटस्फोटनंतरही निलेशचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. निलेश असा कोणता त्रास देत होता की तिला आत्महत्येसारखा निर्णय घ्यावा लागला. याचा तपास पोलीस करत आहे. दरम्यान अश्विनी वर्ध्यातून अकोल्यात कशी आली ? तिच्यासोबत नेमकं काय घडलंय ? याचा तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!