Saturday, July 20, 2024
Homeसामाजिकडॉ. नवलकिशोर अजमेरा यांना स्वर्गिय रामजस सोडाणी स्मृती पुरस्कार जाहीर

डॉ. नवलकिशोर अजमेरा यांना स्वर्गिय रामजस सोडाणी स्मृती पुरस्कार जाहीर

अकोला दिव्य न्युज ब्युरो : राष्ट्रीय पातळीवर प्रकाशित होणाऱ्या माहेश्वरी समाजातील विविध पाक्षिक आणि मासिकांसाठीच वृत्तसेवा व वृत्तसंकलन करणाऱ्या माहेश्वरी पत्रकारांना राष्ट्रीय स्तरावरील माहेश्वरी कपल क्लब तर्फे स्वर्गिय रामजस सोडाणी स्मृतीत दिल्या जाणाऱ्या ‘जर्नलिस्ट ऑफ द इयर’ पुरस्काराने भारतातून 51 माहेश्वरी पत्रकार बंधुंना सन्मानीत करण्यात येणार आहे.

या निवड प्रक्रियेत पहिल्या 10 पत्रकारांची यादी राष्ट्रीय पत्रकार दिनाला जाहिर करण्यात आली.यामध्ये अमरावती – अकोला येथील माहेश्वरी समाजाचे वरिष्ठ कार्यकर्ता पत्रकार स्व. मदनलाल अजमेरा यांचे सुपुत्र डॉ. नवलकिशोर अजमेरा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. अकोला माहेश्वरी समाजासाठी ही गौरवाची बाब आहे.

पत्रकार डॉ. नवलकिशोर अजमेरा अकोला जिल्हा माहेश्वरी संगठन सदस्य, बिकानेर येथील अंतरराष्ट्रीय द्वारिका रणुजा रुणीचा संगम संस्थान ट्रस्ट या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशाचे प्रचार प्रसार मंत्री म्हणून कार्यरत आहेत. या सोबतच विविध संघटनांमध्ये सक्रिय असून. त डॉ. नवलकिशोर अजमेरा यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!